Diwali : दिव्यांप्रमाणेच तुमच्या चेहऱ्यावरही येऊ दे चमक, या खास फेसपॅकचा नक्की करा वापर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दिवाळीत त्वचा चमकदार दिसायला हवी असेल तर ही माहिती नक्की वाचा. दिवाळीच्या स्वच्छतेमुळे दमायला होतं. त्वचेवरची चमक बरीच कमी होते आणि चेहराही थकलेला दिसतो. त्यामुळे, या मोठ्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी या टिप्सचा वापर करता येईल.
मुंबई : दिवाळी आली म्हटलं की घराची स्वच्छता, फराळ, रोषणाई अशी गडबड घरांघरांत असते. या सगळ्यात स्वत:कडे दुर्लक्ष करु नका.
दिवाळीत त्वचा चमकदार दिसायला हवी असेल तर ही माहिती नक्की वाचा. दिवाळीच्या स्वच्छतेमुळे दमायला होतं. त्वचेवरची चमक बरीच कमी होते आणि चेहराही थकलेला दिसतो. त्यामुळे, या मोठ्या उत्सवाचा आनंद घेण्यासाठी या टिप्सचा वापर करता येईल.
भारतातील प्रसिद्ध सौंदर्य तज्ज्ञ शहनाज हुसेन यांनी पाच घरगुती फेस पॅक सुचवले आहेत. यामुळे चेहरा दिसेल सुंदर, त्वचेवर येईल चमक.
advertisement
हळद आणि दही फेस पॅक - दिवाळीपूर्वी त्वचा मुलायम आणि चमकदार बनवण्यासाठी हा फेस पॅक लावू शकता. हळद आणि दही मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि पंधरा मिनिटांनी पूर्णपणे धुवा.
हे दररोज लावल्यानं चेहरा चमकदार दिसतो.
advertisement
लिंबू-काकडीचा रस आणि दूध - लिंबू, काकडीचा रस आणि दुधाचं मिश्रण चेहऱ्यावर लावणं खूप उपयुक्त ठरतं. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा. यामुळे त्वचेचा रंग उजळतो आणि चेहरा उजळतो.
डाग - चेहऱ्यावर अनेक डाग असतील शहनाज हुसेन यांनी सुचवलेला हा फेसपॅक लावू शकता. यासाठी दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मधाची पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे डाग कमी होण्यास मदत होते.
advertisement
मुरुमांपासून आराम - दिवाळीपूर्वी त्वचा चमकदार करण्यासाठी चंदनाचा फेस पॅक वापरू शकता. हा फेस पॅक लावल्यानंतर पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे तुमचा चेहरा चमकदार होईल आणि मुरुमांपासून आराम मिळेल.
टोमॅटोचा रस आणि दही - त्वचा तेलकट असेल आणि सणासुदीच्या काळात चेहरा चमकदार हवा असेल तर हा फेस पॅक वापरून पाहू शकता. हे करण्यासाठी, दही आणि टोमॅटोच्या रसाची पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा.
advertisement
ही पेस्ट चेहऱ्यावर पंधरा मिनिटं राहू द्या आणि नंतर धुवा. यामुळे चेहरा चमकदार आणि नितळ होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 2:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali : दिव्यांप्रमाणेच तुमच्या चेहऱ्यावरही येऊ दे चमक, या खास फेसपॅकचा नक्की करा वापर