फरीदाबाद : आहारात हंगामी फळं आणि भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात. कारण वातावरण बदलताच शरिरातही बदल होतात आणि संसर्गजन्य आजार लगेच जडतात. या आजारांवर मात करण्यासाठी शरिराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं आवश्यक आहे. जी हंगामी फळं आणि भाज्यांमधून मिळते. परंतु एखाद्या विशिष्ट ऋतूमध्ये बाजारात अनेक फळं उपलब्ध असतात, मग त्यापैकी नेमकी कोणती फळं खावी? हेच आपण जाणून घेणार आहोत.
advertisement
डॉक्टर सोनिका यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्यात असा आहार घ्यावा ज्यामुळे शरिरात उष्णता निर्माण होईल आणि त्यातून मिळालेली ऊर्जा बराच काळ टिकेल. त्यामुळे अनेकजण या काळात सूप, चहा आणि कॉफी पितात. परंतु त्यातून शरिरात केवळ तात्पुरती उष्णता निर्माण होते, मात्र पोषक तत्त्व काही मिळत नाहीत. त्यासाठी संतुलित आहारच घ्यावा लागतो आणि फळं खावी लागतात. हिवाळ्यात अशी फळं खावी ज्यामुळे संसर्गजन्य आजारांपासून आपलं संरक्षण होईल.
लसूण उपाशीपोटी खाल्ल्यास वजन झटपट होतं कमी! फक्त खाताना करू नका 'ही' चूक
नाशपाती (पेर) : हे फळ प्रामुख्याने हिवाळ्यात खावं. त्यात व्हिटॅमिन ई आणि सी मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी विविध आजारांपासून आपलं संरक्षण होतं. या फळात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म प्रचंड असतात. त्यामुळे शरिरावर कुठेही सूज असल्यास ती बरी होते.
जेवा आणि ताटपण खाऊन टाका; विद्यार्थ्यांनी बनवली अनोखी भांडी, खाण्यासाठी अट फक्त एकच!
डाळिंब : रक्ताभिरणासंबंधित सर्व व्याधी डाळिंबामुळे बऱ्या होतात. शिवाय डाळिंबामुळे वजन कमी होण्यासही मदत मिळते. हिवाळ्यात डाळिंब खाणं आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं.
सफरचंद : अपचन, बद्धकोष्ठता, इत्यादी आजारांवर सफरचंदामुळे आराम मिळतो. शिवाय रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते. दररोज एक सफरचंद खाल्ल्यास शारीरिक आणि मानसिक विकास होतो.
पेरू : दिसायला साधं पण चवीला उत्कृष्ट अशा या फळात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. परिणामी सर्दी आणि खोकल्यावर सहज आराम मिळतो.
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनलला करा फॉलो...या लिंकवर क्लिक करा https://whatsapp.com/channel/0029Va7W4sJI7BeETxLN6L0g