TRENDING:

पावसाळ्यात आहारात असायलाच हवे काही पदार्थ, नाहीतर व्हाल अशक्त!

Last Updated:

पावसाचं पाणी ठिकठिकाणी साचल्यानं या पाण्यातून मोठ्या प्रमाणात डास उत्पत्ती होण्याची शक्यता असते. या डासांमुळे डेंग्यू, मलेरियासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
काजल मनोहर, प्रतिनिधी
काळजी घेणं कधीही चांगलं.
काळजी घेणं कधीही चांगलं.
advertisement

जयपूर : वातावरण बदललं की, साथीचं आजारपण येतं. त्यात पावसाळ्यात तर सर्वत्र थंड वातावरण असतं. अशा वातावरणात शरिराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. शिवाय अन्नपदार्थांवर विषाणू जास्त काळ टिकतात. त्यामुळे या काळात आजारी पडण्याची शक्यता बळावते. शरिरात रोगप्रतिकारक शक्ती नसेल तर अशक्तपणा येतो.

पावसाचं पाणी ठिकठिकाणी साचल्यानं या पाण्यातून मोठ्या प्रमाणात डास उत्पत्ती होण्याची शक्यता असते. या डासांमुळे डेंग्यू, मलेरियासारखे जीवघेणे आजार होऊ शकतात. त्यामुळे आपण आपली व आपल्या प्रियजनांची काळजी घेणं कधीही चांगलं. निरोगी आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते सकस आहार घेणं. आहारात काही पदार्थांचा समावेश केल्यास आपण नैसर्गिकरित्या आपली रोगप्रतिकारक शक्ती भक्कम करू शकतो. तज्ज्ञ मुकेश लोरा यांनी याबाबत माहिती दिली आहे.

advertisement

हेही वाचा : जरा पाऊस पडला की पोटात होतं गुडगुड? हसण्यावारी घेऊ नका, झटपट उपाय करा!

मुकेश सांगतात, आजारांशी लढण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असणं गरजेचं असतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी शरिराला C व्हिटॅमिन मिळणं आवश्यक असतं. त्यासाठी संत्र, शिमला मिरची, ब्रोकली, कीवी, स्ट्रॉबेरी अशा व्हिटॅमिन सीने परिपूर्ण पदार्थांचा आहारात समावेश करावा.

advertisement

प्रोबायोटिक्स तत्त्वामुळे एलर्जीपासून शरिराचं रक्षण होतं. दह्यात प्रोबायोटिक्स गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे दही खाणं फायदेशीर ठरू शकतं. बदाम, भोपळ्याच्या बिया, पालक, डार्क चॉकलेट यातूनही भरपूर मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म मिळतात. ज्यामुळे एलर्जीपासून शरिराचं रक्षण होऊ शकतं. हळद, आलं, हिरव्या पालेभाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे थंड वातावरणात शरिरावर आलेली सूज ओसरते. तसंच मुकेश लोरा सांगतात, चिया सीड्स, आळशी आणि अक्रोडही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

advertisement

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पावसाळ्यात आहारात असायलाच हवे काही पदार्थ, नाहीतर व्हाल अशक्त!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल