जरा पाऊस पडला की पोटात होतं गुडगुड? हसण्यावारी घेऊ नका, झटपट उपाय करा!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
शरिरातील विविध आजारांची सुरूवात पोटापासून होते. त्यामुळे निरोगी राहायचं असेल तर पोट सुदृढ असणं आवश्यक आहे. यासाठी आज आपण घरगुती रामबाण उपाय जाणून घेणार आहोत, ज्यामुळे पोट निरोगी राहीलच, शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत मिळेल.
advertisement
कडूलिंब जेवढं कडू तेवढं शरिरासाठी फायदेशीर. यामुळे केवळ पोट नाही, तर त्वचासुद्धा निरोगी राहते. विशेषतः ऍसिडिटीवर आराम मिळवण्यासाठी सकाळी कडूलिंबाची पानं घालून उकळलेलं पाणी उपाशीपोटी पिण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे ऍसिडिटी आणि पोटदुखी दोन्ही दूर होते.
advertisement
advertisement
तुळशीला आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचा काढा किंवा चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. यात अँटिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे पोटातील आतड्या भक्कम राहतात.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.