Instant Glow येत नाही, पण त्वचा स्वच्छ होते! केळ्याच्या सालीने मसाज करून तर बघा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
सहसा आपण केळ्याचा गर खाऊन साल फेकून देतो. परंतु या सालीतच फायबर, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, बी12, झिंक, मॅग्नेशियम, इत्यादी अनेक अँटीऑक्सिडंट्स दडलेले असतात.
रिया पांडे, प्रतिनिधी
नवी दिल्ली : लहानपणापासूनच निरोगी आरोग्यासाठी डॉक्टर फळं खाण्याचा सल्ला देतात. विविध फळांमधून आरोग्याला पोषक तत्त्व मिळतात. केळ्यातसुद्धा अनेक आरोग्यपयोगी गुणधर्म असतात. डॉक्टर सांगतात की, 12 वर्षांपेक्षा जास्त वयाचे सर्वजण तुकतुकीत त्वचेसाठी केळ्याचा वापर करू शकतात. परंतु आतल्या गराचा नाही, तर केळ्याच्या सालीचा.
सहसा आपण केळ्याचा गर खाऊन साल फेकून देतो. परंतु या सालीतच फायबर, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी6, बी12, झिंक, मॅग्नेशियम, इत्यादी अनेक अँटीऑक्सिडंट्स दडलेले असतात. ज्यामुळे त्वचा छान तजेलदार होऊ शकते. डॉ. नेहा यांनी सांगितलं की, उन्हामुळे त्वचेवर काळपट थर साचतो. जर केळ्याच्या सालीत कॉफी मिसळून लावली तर त्वचेवरचा काळपटपणा दूर होऊ शकतो.
advertisement
वाढत्या वयासह त्वचेवर सुरकुत्या येतात. ज्या घालवण्यासाठी आपण अनेक महागडे प्रॉडक्ट्स वापरतो. त्यापेक्षा त्वचेवर हलक्या हाताने केळ्याच्या सालीने मसाज केल्यास त्वचेला मॉइश्चरायझर मिळतं. त्यामुळे हळूहळू सुरकुत्या कमी होऊ शकतात. तसंच जर त्वचेवर डाग असतील तर, त्यावरही केळ्याची साल फायदेशीर ठरू शकते. यात पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे त्वचेवरील पोर्स उघडतील आणि डाग हळूहळू कमी होतील.
advertisement
त्याचबरोबर त्वचेवर ग्लो येण्यासाठी आपण केळ्याच्या सालीत साखर आणि हळद मिसळून लावू शकता. ज्यामुळे आपल्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येऊ शकेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे केळ्याच्या सालीत व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे त्वचा स्वच्छ होऊ शकते.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
July 17, 2024 5:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Instant Glow येत नाही, पण त्वचा स्वच्छ होते! केळ्याच्या सालीने मसाज करून तर बघा