डाळिंबाच्या दाण्यात लपलेत गुणकारी फायदे; डायबिटीज पेशंट खाऊ शकतात?
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
डाळिंब अँटीऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असतं. यात भरपूर अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्मही असतात. त्यामुळे डाळिंब खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी
नवी दिल्ली : प्रत्येक फळातून शरिराला विविध पोषक तत्त्व मिळतात. गोड फळ खाल्ल्यानं शरीर ऊर्जावान होतं. त्यापैकीच एक डाळिंब. डाळिंबाचे आरोग्याला नेमके काय फायदे होतात याबाबत माहिती दिली आहे डायटिशियन प्रियंका जयस्वाल यांनी.
डायट टू नरिशच्या फाउंडर प्रियंका जयस्वाल सांगतात की, सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे. विशेषतः आहारात फळांचा समावेश असायला हवा. डाळिंब अँटीऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असतं. यात भरपूर अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्मही असतात. त्यामुळे डाळिंब खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
advertisement
डाळिंबात भरपूर आयर्न असतं, ज्यामुळे शरिरातली रक्ताची कमतरता भरून निघते. गरोदरपणातही डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. तसंच यात असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. शरिराला ऊर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
डायटिशियन प्रियंका यांनी सांगितलं की, शरिरात रक्ताची कमतरता असेल किंवा वजन वाढवायचं असेल तर डाळिंबाचा रस फायदेशीर ठरतो. विशेषतः लहान मुलांनी डाळिंबाचा रस प्यावा. स्थूलपणा, डायबिटीजवर डाळिंब गुणकारी असतं. यातून भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी मिळतं. त्यामुळे आपण दररोज कपभर डाळिंबाचे दाणे खाल्ले किंवा रस प्यायला तर उत्तम.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
July 18, 2024 1:37 PM IST