घरात मनी प्लांट असेल तर काळजी घ्या! विनाकारण नको ते दुखणं घ्याल ओढावून

Last Updated:
Avoid dengue tips: अनेकजण घरात मनी प्लांट ठेवतात. असं म्हणतात की, या झाडामुळे घराची भरभराट होते. परंतु हे रोप पाण्यात लावलं असेल, तर त्यात डास उत्पत्ती होऊन डेंग्यूला आमंत्रण मिळू शकतं. त्यामुळे नको ते दुखणं तुम्ही स्वतः ओढावून घ्याल.
1/5
तुम्हीसुद्धा घरात काचेच्या बाटलीत किंवा इतर कोणत्या भांड्यात सजावट म्हणून मनी प्लांट लावलं असेल. तर आताच सतर्क व्हा. यात जर डेंग्यूचे डास निर्माण झाले, तर आपण एकटेच नाही, तर आपलं पूर्ण कुटुंब आजारी पडू शकतं.

advertisement
2/5
बहुतेक लोक आपल्या घरात आर्थिक भरभराटीसाठी मनी प्लांटची लागवड करतात. या झाडामुळे घराचं सौंदर्य वाढतंच, शिवाय घरातील व्यक्तींचं आरोग्यही सुदृढ राहतं असं म्हणतात. शिवाय या झाडामुळे घरातलं वातावरणही शुद्ध होतं. मात्र त्यासाठी आपण ज्या बाटलीत हे रोप लावलं असेल, ती बाटली वेळोवेळी स्वच्छ करून त्यातलं पाणी बदलावं.

3/5
पावसाळ्यात साथीचे आजार डोकं वर काढतात. या काळात मलेरिया, कावीळ, डेंग्यू होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे सर्वांनी आपापली काळजी घ्यावी. केवळ मनी प्लांट नाही, तर इतर रोपांच्या कुंड्यांमध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होऊ शकते. शिवाय घरातील पाण्याची भांडीही वेळच्या वेळी घासून, धुवून स्वच्छ करावी. जास्त काळ एका भांड्यात पाणी भरून ठेवू नये.

4/5
रात्री झोपण्यापूर्वी मच्छरदाणी लावूनच झोपावं. संध्याकाळ होताच खिडकी आणि दरवाजे बंद करावे. शिवाय पूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे. मात्र आपल्याला गुदमरल्यासारखं वाटणार नाही याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात साधी कणकण जरी वाटली, तरी डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यावर वेळीच उपचार करावे. नाहीतर ही साधी कणकणही गंभीर होऊ शकते.

5/5
 आरोग्य अधिकारी सांगतात की, चा डास एकावेळी पाण्यात 250 अंडी देऊ शकतो. त्याच्या संपूर्ण जीवनात हा डास 3 वेळा अंडी देतो. त्यामुळे आपण स्वतः  घ्यावी. परंतु लक्षात घ्या, ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली, तरी आपण आपल्या  कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
आरोग्य अधिकारी सांगतात की, डेंग्यूचा डास एकावेळी पाण्यात 250 अंडी देऊ शकतो. त्याच्या संपूर्ण जीवनात हा डास 3 वेळा अंडी देतो. त्यामुळे आपण स्वतः खबरदारी घ्यावी. परंतु लक्षात घ्या, ही माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित असली, तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement