Dengue vs Viral Fever : डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरमधील फरक कसा ओळखावा? तज्ज्ञांनी सांगितले महत्त्वाचे मुद्दे
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
डेंग्यूचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे ताप. पण उन्हाळयात इत्तर अनेक कारणांमुळेही ताप येऊ शकतो. अशावेळी हा ताप डेंग्यूचा आहे की सामान्य व्हायरल फीव्हरचा आहे, हे आपल्याला बऱ्याचदा ओळखता येत नाही.
मुंबई : ऋतू कोणताही असो डास घरात येतातच. उन्हाळ्यातही हेच घडते. मात्र यामुळे डेंग्यू या घातक आजाराचा धोका वाढतो. डास चावल्यानंतर सर्वात जास्त भीती आपल्याला या आजाराची वाटते. डेंग्यूचे सर्वात महत्त्वाचे लक्षण म्हणजे ताप. पण उन्हाळयात इत्तर अनेक कारणांमुळेही ताप येऊ शकतो. अशावेळी हा ताप डेंग्यूचा आहे की सामान्य व्हायरल फीव्हरचा आहे, हे आपल्याला बऱ्याचदा ओळखता येत नाही. आज आम्ही तुम्हाला या दोन्हीतील फरक सांगत आहोत.
अलीकडच्या काळात जगभरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या अहवालानुसार, 2000 मध्ये डेंग्यूचे 5 लाख रुग्ण होते, जे 2019 मध्ये 52 लाख झाले. डेंग्यूच्या बहुतेक प्रकरणांमध्ये, एकतर बरीच लक्षणे दिसत नाहीत किंवा सौम्य लक्षणे दिसतात, ज्यामुळे नोंदवलेल्या रुग्णांची संख्या खूपच कमी असू शकते. सामान्य ताप आणि डेंग्यू यांच्यात फरक कसा करायचा हे जाणून घेऊया नोएडा येथील फेलिक्स हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. डीके गुप्ता यांच्याकडून.
advertisement
डेंग्यू ताप (ब्रेक-बोन फिव्हर) हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे, जो डासांपासून व्यक्तीमध्ये पसरतो. हे उष्ण आणि दमट हवामानात अधिक घडते. ज्यांना डेंग्यूची विशिष्ट लक्षणे समजत नाहीत, त्यांच्यामध्ये खूप ताप, डोकेदुखी, अंगदुखी, मळमळ आणि खाज सुटणे ही लक्षणे दिसतात. काही लोक 1 किंवा 2 दिवसात डेंग्यूमधून बरे होतात. मात्र ज्यांना अधिक गंभीर लक्षणे दिसतात, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते.
advertisement
सामान्य तपापेक्षा जास्त घातक असतो डेंग्यूचा ताप..
काही लक्षणे सामान्य तापापेक्षा वेगळी असतात आणि ती गंभीरही असतात. जर एखाद्या व्यक्तीला ताप येत असेल आणि तापासोबतच शरीरात सांधेदुखीचा त्रास होत असेल तर हा ताप डेंग्यू ताप असू शकतो. याशिवाय स्नायू दुखणे, डोळ्यांच्या पाठीमागे दुखणे, नाक व दातांमधून रक्त येणे, अंगावर लाल ठिपके किंवा खाज येणे, इत्यादी डेंग्यूची लक्षणे असू शकतात. म्हणजेच जर एखाद्या व्यक्तीला अशी समस्या सतत होत असेल तर समजून घ्या की, हा सामान्य नसून डेंग्यू ताप आहे. याशिवाय डेंग्यूचा ताप 104 अंशांवर जाऊ शकतो. मात्र विषाणूजन्य ताप म्हणजेच व्हायरल फिव्हर 103 अंशांच्या वर जात नाही.
advertisement
ताप गेल्यानंतर दिसतात ही लक्षणं..
याशिवाय, ताप जास्त असल्यास रक्त तपासणी करून प्लेटलेटचे प्रमाण कमी असले तरी, हा सामान्य नसून डेंग्यू ताप असल्याचे स्पष्ट होते. इतकंच नाही तर अनेक प्रकरणांमध्ये असंही दिसलं आहे की, काही वेळा ताप उतरल्यानंतर रुग्णामध्ये आणखी अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. जसे की पोटात तीव्र वेदना, सतत उलट्या होणे, जलद श्वास घेणे, थकवा, निद्रानाश किंवा स्टूलमध्ये रक्त येणे इ. डेंग्यूच्या विपरीत, जर तुमचा ताप सामान्य असेल तर तो 2 किंवा 3 दिवसांत निघून जातो आणि त्यावर अँटिबायोटिक्सने उपचार केले जाऊ शकतात.
advertisement
कोणाला डेंग्यूसारखी लक्षणे दिसली, विशेषत: लहान मुलांमध्ये तर अजिबात त्याकडे दुर्लक्ष करू नका. रुग्णाला ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा. याशिवाय डास हे डेंग्यूचा फैलाव होण्याचे कारण आहेत, त्यामुळे जवळपास कुठेही डासांची उत्पत्ती होऊ नये याची काळजी घ्यावी. आपला परिसर स्वच्छ ठेवा आणि दिवसाही डासांपासून दूर राहा.
advertisement
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 10, 2024 2:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dengue vs Viral Fever : डेंग्यू आणि व्हायरल फिव्हरमधील फरक कसा ओळखावा? तज्ज्ञांनी सांगितले महत्त्वाचे मुद्दे