कोल्हापूर : जिलेबी हे असं पक्वान्न आहे जे आवडत नाही असा माणूस विरळच. खवा, रबडी, अफगाणी, छेना असे बरेच प्रकार जिलेबी मध्ये प्रसिद्ध आहेत. पण कधी सेंद्रिय गुळापासून बनलेली जिलेबी आपण खाल्ली आहे का? प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण याचा आस्वाद कोल्हापुरात घेऊ शकता. कोल्हापुरातील मिरजकर तिकटी परिसरात करंबे कुटुंबाने 25 जानेवारी आणि 26 जानेवारीला स्टॉलची उभारणी केली आहे. यांच्या माध्यमातून आपण या गरमागरम ताज्या अस्सल सेंद्रिय पद्धतीने बनलेल्या जिलेबीचा आस्वाद घेऊ शकतो.
advertisement
प्रगतशील शेतकऱ्याचा जिलेबीचा अनोखा प्रयोग
गेल्या वर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने करंबे कुटुंबाने सेंद्रिय गुळापासून बनलेल्या जिलेबीला कोल्हापूरकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता. आता यंदाच्या 26 जानेवारीला अर्थातच प्रजासत्ताक दिनी कोल्हापुरातील मिरजकर तृप्ती परिसरामध्ये या करंबे कुटुंबांचा स्टॉल उभारला आहे.
तसं म्हणायला गेलं तर गूळ हा वेगवेगळे पदार्थ तयार करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. पण जंक फूडच्या ओघात खाण्यात कमी केला जात आहे. सेंद्रिय गुळाचे महत्व कळावे तसेच त्याची जनजागृती व्हावी यासाठी काही शेतकरी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्यावर संशोधन करून असे वेगवेगळे प्रयोग करत असतात.
दख्खनचा राजा जोतिबाचं दर्शन पुन्हा सुरू, मंदिरात भाविकांच्या रांगा, पण का होतं बंद?
गुळापासून जिलेबी बनविण्याची कल्पना खोलखंडोबा परिसरातील रहिवासी प्रगतशील शेतकरी राजू करंबे आणि ऊस संशोधन केंद्रातील यशवंत पाटील, कृष्णात पाटील व पोहाळे- बोरगाव येथील प्रा. अशोक पाटील यांना सुचली. त्यातून सेंद्रिय गूळ आणि गायीच्या तुपातील जिलेबी आकाराला आली आहे.
सेंद्रिय गुळाच्या जिलेबीमध्ये कोणते घटक?
कोल्हापुरातील करंबे कुटुंबाने ही जिलेबी सुरू केली आहे. या जिलेबीमध्ये सेंद्रिय गुळाचा वापर करण्यात आलेला आहे. या जिलेबीत मैदा, बेसन आणि गुळाचा पाक यासह सर्व प्रकारच्या डाळींचे पीठ वापरले गेले आहे. साधारणतः सेंद्रिय गुळाची जिलेबी ही एक किलोमध्ये जिलेबीचे किमान 27 तुकडे असतात. 100 ग्रॅम भारतीय जिलेबीत 300 कॅलरीज असतात. गुळाची जिलेबी ही साधारण तीन ते चार दिवस टिकते.
साखर आणि गूळ या दोन्ही गोष्टी उसापासून बनवल्या जातात. यापैकी पांढरी साखर ही रिफाइंड स्वीटनर आहे. यामध्ये सल्फर डाय-ऑक्साइड, कॅल्शियम डायॉक्साईड, फॉस्फरिक ऍसिड या रसायनांचा वापर केला जातो. यामुळे ऊसातील जीवनसत्वे, प्रथिने, खनिजे आणि पोषकत्वे निघून जाण्याचे प्रमाण वाढते. या सगळ्याचा विचार करून नवीन प्रयोगाचा भाग म्हणून आम्ही सर्वांना आरोग्यदायी अशी आणि त्यासोबतच डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनाही जिलेबीचा आस्वाद घेता येईल अशी सेंद्रिय गुळापासून बनवलेली जिलेबी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथे उपलब्ध करून दिली आहे. कोल्हापूरकरांनी याचा भरभरून आस्वाद घ्यावा, असे आवाहन शेतकरी राजू करंबे यांनी केले आहे.