कोल्हापूर : उन्हाळ्यात ताक पिण्याकडे बऱ्याच जणांचा ओढा असतो. ताकामुळे शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यातच फक्त ताक विकून आपली घरची परिस्थिती सुधारणारे काही विक्रेते देखील आपल्याला पाहायला मिळतात. कोल्हापुरात देखील असे एक कष्टकरी पवार कुटुंब ताकाचा व्यवसाय करते. गेल्या जवळपास 23 वर्षांपासून त्यांनी त्यांच्या ताक विक्रीच्या व्यवसायासह घरच्या आर्थिक परिस्थितीमध्ये देखील सुधारणा आणल्या आहेत.
advertisement
मोहन पवार हे गृहस्थ कोल्हापुरातील वाकरे गावचे रहिवासी आहेत. कोल्हापूर शहरात आणि परिसरात दूध वाटपाचे काम ते करत असत. मात्र उदरनिर्वाहासाठी स्वतःचा एक छोटासा व्यवसाय म्हणून 2001 साली त्यांनी कोल्हापूर शहरात रंकाळा परिसरात ताक विक्री करायला सुरू केली होती. फक्त एक छोटा टेबल आणि त्यावर दोन मातीच्या डेऱ्यात ताक बनवून ते विकायचे. त्यांनी बनवलेला ताकाची चव लोकांना आवडायला लागल्यामुळे त्यांच्या व्यवसायात प्रगती होऊ लागली. हळूहळू व्यवसाय इतका वाढला की घरच्या जवळपास सर्व सदस्यांना व्यवसायात सामावून घ्यावे लागले, असे मोहन पोवार सांगतात.
कोल्हापुरातील महाद्वार रोडची स्वस्तात मस्त शॉपिंग, फक्त 150 रुपयांपासून मिळतात मुलींचे टॉप, Video
रोज 125 ते 150 लिटर दह्याचा वापर
मोहन पवार यांच्या रंकाळ्यावरील ओम गणेश ताक सेंटरवर बरेच जण ताक पिण्यासाठी लांबहून येत असतात. घरगुती पद्धतीने हे ताक बनवलेले असल्यामुळे कोल्हापूरकरांना त्याची चव आवडू लागली आहे. त्यामुळेच उन्हाळ्याच्या दिवसात पवार यांच्याकडे दररोज सव्वाशे ते दीडशे लिटर दह्याचा वापर करून त्यापासून ताक बनवले जाते. हे इतके ताक कोल्हापूर शहरातील एकमेव अशा त्यांच्या ताक सेंटरवर ते विकतात. त्याचबरोबर त्यांच्या मुलांनी ताकाचे पॅकेट्स देखील आता जवळपासच्या दुकानात विकायला सुरुवात केली आहे, अशीही माहिती मोहन पोवार यांनी दिली आहे.
व्यवसायामुळे जनावरांना देता आला नाही वेळ
मोहन पवार यांच्याकडे सुरुवातीला स्वतःची जनावरे होती. ती जनावरे सांभाळत त्यांचे दूध हे सर्वत्र पोहोच करण्याचे काम मोहन करत. मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यानंतर हळूहळू जनावरंकडे लक्ष देणे जमेनासे झाले. त्यांच्या चारा आणि पाण्यासाठी वेळ देण्याचा प्रश्न उद्भवू लागला. त्यामुळेच त्यांनी स्वतःची जनावरे देऊन टाकली आहेत. सध्या ताकासाठी दूध संस्थांमधून किंवा बाजारातील पॅकेट्सचे दूध देखील घेतात, असेही पोवार सांगतात.
किती रुपये आहे ताक आणि लस्सी?
मोहन पवार यांच्या स्टॉलवर ताक, लस्सी असे पेय आणि घट्ट दही देखील मिळते. 2001 साली त्यांनी ताक विक्री सुरू केली होती, तेव्हा फक्त 2 रुपये प्रति ग्लास ते विकत होते. मात्र हळूहळू महागाई वाढेल तशी त्यांनाही दर वाढवणे भागच होते. सध्या सामान्य माणसाला परवडेल असे 12 रुपये प्रति ग्लास ताक आणि 25 रुपये प्रतिग्लास लस्सी असेल दर ठेवले असल्याचे देखील मोहन सांगतात.
दरम्यान मोहन यांच्याकडे मिळणारे ताक हे इतके प्रसिद्ध आहे की, प्लास्टिक बॉटलमध्ये ताक भरून नेण्यासाठी देखील अनेक ग्राहक या ठिकाणी येत असतात. रंकाळ्याच्या पूर्व बाजूला सरनाईक कॉलनी समोर सकाळी 11 ते संध्याकाळी जास्तीत जास्त 5 वाजयच्या आत ताक संपेपर्यंत मोहन पोवार ताक आणि लस्सी, विक्री करत असतात. तितकीच गर्दी देखील या काळात त्यांच्या ताकाच्या स्टॉलवर होत असते.
आरोग्याचा खजिना आहे शेवगा, पाहा शेंगाचं सूप बनवायचं कसं? Video
पत्ता : ओम गणेश ताक सेंटर, सरनाईक कॉलनी समोर, रंकाळा पूर्व बाजू, कोल्हापूर - 416012