पूर्वापार भेळ विक्रीचा व्यवसाय
बीड शहरातील सारडा नगरी या परिसरामध्ये दत्ता राऊत यांनी 2018 मध्ये रगडा पकवान विक्रीला सुरुवात केली. त्यांचे वडील पूर्वीपासून पारंपारिक पद्धतीने भेळचा व्यवसाय करत होते. दत्ता हे भारतातील विविध राज्यांमध्ये फिरल्यानंतर त्यांना रगडा पकवानची चव चाखायला मिळाली. त्यांनी बीडमध्ये आल्यानंतर भेळ व्यवसायासोबत रगडा पकवानच्या विक्रीला सुरुवात केली. सुरुवातीला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद होता. मात्र हळूहळू त्यांनी तयार केलेल्या रगडा पकवानाला खवय्यांची मोठी पसंती मिळू लागली.
advertisement
फक्त एकाच वडापावमध्ये पोट फूल्ल; सोबत दिलेल्या या पदार्थाने वड्याला येते वेगळीच चव!
कसा तयार होतो रगडा पकवान?
अगदी घरगुती पद्धतीने हे रगडा पकवान तयार केले जाते. पकवान हे मैद्यापासून तयार केलेले असते. साधारणत: दुपारी चारच्या सुमारास या रगडा पकवानच्या विक्रीला सुरुवात होते. यामध्ये घरगुती पद्धतीने तयार केलेले आंबट गोड पाणी त्यासह लाल तिखट, काळे तिखट, शिजवलेली डाळ आणि त्यामध्ये गरमागरम मटकी, कांदा आणि त्यावर कोथिंबीर टाकली जाते. त्यामुळे हा रगडा पकवान अधिकच चवदार आणि झणझणीत लागतो.
कांदा-लसूणशिवाय समोसा कधी खाल्लाय का? टेस्ट लयभारी पण मिळतोय कुठं?
किती आहे किंमत?
पूर्वीपासून आमचे वडील भेळचा व्यवसाय करत होते. मात्र मी राजस्थान, मध्य प्रदेश यासह उत्तर प्रदेश मध्ये या रगडा पकवानाचा पदार्थाची चव चाखली. 2018 मध्ये रगडा पकवानाच्या विक्रीला बीड शहरात पहिल्यांदा सुरुवात केली. त्यावेळी दिवसाकाठी 20 ते 50 प्लेटची विक्री होत होती. त्यावेळी याचा दर पंचवीस रुपये प्रति प्लेट होता. मात्र आता दिवसाकाठी 200 ते 250 प्लेटची विक्री होते आणि आता याचा दर 30 रुपये इतका केला आहे, असे रगडा पकवान विक्रेते दत्ता राऊत यांनी सांगितले.