फक्त एकाच वडापावमध्ये पोट फूल्ल; सोबत दिलेल्या या पदार्थाने वड्याला येते वेगळीच चव!
- Published by:News18 Marathi
- Written by:News18 Marathi
Last Updated:
हा वडापाव एकदा खाल्ला तरी पोट भरते. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची त्यामुळे मोठी सोय झालीय.
बीड शहरातील नगर रोड परिसर मध्ये 2003 मध्ये शशिकांत रसाळ यांनी एका छोट्याशा स्टॉलवर वडापावच्या विक्रीला सुरुवात केली. या भागात अनेक सरकारी कार्यालय आहेत. त्या कार्यालयात वेगवेगळ्या कामांसाठी ग्रामीण भागातले नागरिक येतात. त्यांची गैरसोय होऊ नये तसंच एका वडापावमध्ये त्यांचं पोट भरावं या उद्देशानं त्यांनी जम्बो वडापावच्या विक्रीला सुरूवात केली.
advertisement
रसाळ यांनी वडापाव विक्रीला सुरूवात केली त्यावेळी तीन ते चार किलो बटाट्याचे मिश्रण लागत असे. तसंच दिवसाला 50 ते 60 प्लेटची विक्री होत होती. त्यावेळी एका वडापावची किंमत 5 रुपये होती. या वडापावची साईज मोठी होती. त्यामुळे तो ग्राहकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला.
advertisement
सध्या दिवसाला 15 ते 16 किलो बटाटे हे वडापावच्या मिश्रणासाठी लागतात. तसंच रोज 300 ते 400 प्लेटची विक्री होते. या वडापावचा दरही आता बारा रुपयांपर्यंत पोहचल. पण, घरगुती पद्धत आणि स्वच्छता यामुळे या परिसरात त्यांचे ग्राहक वाढलेत.
advertisement
'मी गेल्या 20 वर्षांपासून वडापाव विकतो. तो बनवण्यासाठी घरगुती पद्धतीनं लाल आणि काळा मसाला, हिरव्या मिरची पेस्ट हे सर्व एकत्र करुन हा वडापाव तयार करतो. त्यासोबत शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी आणि आंबट-गोड पाणीही देतो. त्यामुळे ग्राहक इथं नेहमी आकर्षित होतात, असं रसाळ यांनी सांगितलं.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
September 08, 2023 1:30 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
फक्त एकाच वडापावमध्ये पोट फूल्ल; सोबत दिलेल्या या पदार्थाने वड्याला येते वेगळीच चव!