कांदा-लसूणशिवाय समोसा कधी खाल्लाय का? टेस्ट लयभारी पण मिळतोय कुठं?
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
हा समोसा कांदा लसूण विरहित असून सुद्धा याची चव अप्रतिम लागते. विशेष म्हणजे हीच याची खासियत आहे.
रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते चटकदार रेस्टॉरंटपर्यंत समोसा तुम्हाला हव्या त्या ठिकाणी खायला मिळू शकतो. असाच चटकदार आणि चवदार समोसा मिळण्याचे ठिकाण प्रत्येक गावामध्ये दिसून येते. बीडमधील स्टेडियम रोड परिसरात एक रेस्टॉरंट असून येथील समोसा खूप प्रसिद्ध आहे.
advertisement
बीड शहरातील स्टेडियम रोड परिसरामध्ये अनेक खवय्यांना हवेहवेसी वाटणारी स्नॅक सेंटर आणि रेस्टॉरंट आहेत. या ठिकाणी अनेक विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. यामधील स्वराष्ट्र स्वीट होममध्ये मिळणाऱ्या गरमागरम समोस्याची चव काही न्यारीच आहे. विशेष म्हणजे हा समोसा कांदा लसूण विरहित असून सुद्धा याची चव अप्रतिम लागते. विशेष म्हणजे हीच याची खासियत आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement