मुंबई : मुंबई एक असे धावते शहर जिथे स्ट्रगल कोणाला मुकलेला नाही. एक एक दिवस या ठिकाणी काढण्यासाठी लोक जीवाच्या आकांताने प्रयत्न करत असतात. इथल्या प्रत्येक व्यक्तीची आपली अशी एक वेगळी कहाणी आहे. अशाच एका मुंबईकर महिलेची संघर्ष कहाणी तुम्हाला सांगणार आहोत. मुंबईतील दादरच्या मांजरेकर काकू म्हणून प्रसिद्ध असलेल्या या महिलेचे 41 वर्ष जुने असे लहानसे वडापाव भजी पावचे स्टॉल आहे.
advertisement
41 वर्षांपासून चालवतात स्टॉल
मुंबईतील दादरच्या टीटी सर्कल परिसरात विनया दत्ताराम मांजरेकर यांचे एका लेनवर वडापावचे एक लहानसे स्टॉल आहे. विनया दत्ताराम मांजरेकर गेले 41 वर्षांपासून या ठिकाणी येऊन आपला स्टॉल चालवतात. काकूंच्या हातचे चविष्ट भजी आणि वडापाव खाण्यासाठी खवय्ये स्टॉल सुरू होण्यापूर्वीच त्या ठिकाणी येऊन वाट बघत असतात.
उपवासाची मिसळ खावी तर आप्पाची, पुण्यात 55 वर्षांपासून फेमस आहे हे ठिकाण, Video
1983 पासून विनया यांचे पती दत्ताराम मांजरेकर या ठिकाणी शेवपुरी आणि पाणीपुरीचा व्यवसाय करत होते. साल 2000 मधे पतीचे निधन झाल्यामुळे मुंबई सारख्या शहरात उदरनिर्वाह कसा करायचा? मुलीला कसे सांभाळायचे? या प्रश्नात बुडालेल्या मांजरेकर काकू महिनाभरातच पुन्हा काम करायला लागल्या. सुरुवातीला त्या आठ रुपयांना वडापाव विकत होत्या.
Famous Food : नाश्त्यासाठी घरीच बनवा ‘हा’ फेमस गुजराती पदार्थ, एकदा खाल तर खातच राहाल
स्वतःचा ठाव ठिकाणा नसल्यामुळे त्या सिग्नल जवळ परातीत वडापाव विकत होत्या. पती नसल्यावर जगणे अतिशय अवघड होते. परंतु मुलीसाठी त्या आजही वयाच्या साठीत देखील वडापाव विकण्याचा व्यवसाय करत आहेत. मुंबईसारख्या शहरात स्ट्रगल करण्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. आपल्या वाटेचा संघर्ष आपल्यालाच करणे आहे, असं विनया मांजरेकर यांचे मत आहे.