नाशिक: चटपटीत पाणीपुरी सर्वांनाच आवडते. पण हीच पाणीपुरी आयुर्वेदिक असेल तर? अनेकांना कल्पना म्हणून भारी वाटेल. परंतु, नाशिकच्या एका तरुणानं हीच कल्पना सत्यात उतरवलीये. तब्बल 42 आयुर्वेदिक वनस्पतींचं पाणी वापरून दत्तू शेळके हे पाणीपुरी देतात. विशेष म्हणजे या आयुर्वेदिक पाणीपुरीचं पेटंटच शेळके यांना मिळालं आहे. ही खास पाणीपुरी खाण्यासाठी नेहमीच त्यांच्या स्टॉलवर नाशिककरांची नेहमीच गर्दी असते.
advertisement
अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच पाणीपुरी आवडत असते. परंतु, काही कारणास्तव आणि विशेषत: दूषित पाण्यामुळं अनेकजण बाहेर पाणीपुरी खाणं टाळत असतात. ही पाणीपुरी सर्वांना बिनधास्त खाता यावी या करता दत्तू शेळके यांनी थेट आयुर्वेदिक पाणीपुरी सुरू केलीये. तब्बल ४२ आयुर्वेदिक तत्त्वांनी बनविलेली पाणीपुरी ते आपल्या ग्राहकांना देतात. परंतु, ही पाणीपुरी बनवण्याची कल्पना कशी सूचली आणि पाणीपुरी बनवली खशी जाते? याबाबत त्यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
साधीसुधी नाही फायर पिझ्झापुरी खाल्लीये का? पुण्यात इथं मिळतेय खास डिश
अशी सुचली कल्पना?
पाणीपुरी सर्वांना आवडते. पण, अनेक ठिकाणी फक्त नावालाच हाईजीनिक वस्तूंचा वापर केला जातो. अलीकडच्या काळात म्हणजेच कोरोन नंतर अनेक खवय्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. त्याकरिता आपले स्वास्थ्या सांभाळणे सर्वांनाच गरजेचे वाटतेय. दत्तू यांचा जवळीक मित्र आयुर्वेदिक वैद्य आहे. त्यांचाकडे दत्तू यांचे जाणे येणे होत होते. तेव्हा त्यांना ही कल्पना सुचली. आपण देखील आयुर्वेदिक पाणीपुरी सुरू करावी असा विचार त्यांच्या मनात आला. तो त्यांनी आईसोबत बोलून दाखवला. तेव्हा आईनं काही आयुर्वेदिक वनस्पतींची नावं सांगितली. मित्राला विचारल्यावर त्यानं देखील योग्य मार्गदर्शन केलं आणि आयुर्वेदिक पाणीपुरीची कल्पना सत्यात उतरल्याचं दत्तू सांगतात.
आयुर्वेदिक पाणीपुरीला मिळालं पेटंट
सुरुवातीला पाणीपुरीसाठी बनवलेलं आयुर्वेदिक पाणी हे कळकट लागत होतं. मित्रासोबत चर्चा करून आणि काही प्रयोग करून त्याची चव अगदी चटपटीत झाली. त्यानंतर झोम्बलस्टिक पाणीपुरी हे नाव देऊन पाणीपुरी विक्री सुरू केली. झोम्पलस्टिक म्हणजेच झणझणीत आणि गोड असणारी ही पाणीपुरी अनेकांना आवडली. त्यामुळे अगदी महाराष्ट्राच्या बाहेरील लोक देखील नाशिकमध्ये आल्यावर पाणीपुरी खाण्यासाठी येऊ लागले. या पाणीपुरीला पेटंट देखील मिळालं. लोकांच्या मागणीनुसार पुढे नाशिक आणि राज्याच्या बाहेर देखील आयुर्वेदिक पाणीपुरीच्या शाखा सुरू झाल्या, असं दत्तू यांनी सांगितलं.
झिंग झिंग झिंगाट! चक्क कोंबड्या पितायेत टँगो, म्हणे देशी दारूचा फायदाच झाला!
आयुर्वेदिक पाणीपुरी का आहे खास?
आयुर्वेदिक पाणीपुरी फक्त 30 रुपयात मिळत असून तब्बल 42 आयुर्वेदिक तत्वांचा आणि मिनरल वॉटरचा उपयोग करून बनवली जाते. पाणीपुरीसाठी पाणी बनवताना तुळशी, अश्वगंधा, अद्रक, पुदिना, आवळा, खजूर, लिंबू, लवंग, मिरे, दालचिनी असे 42 आयुर्वेदिक घटक वापरले जातात. हे घटक शरीरासाठी अत्यंत लाभदायी मानले जातात. तर पुरी देखील विविध डाळींपासून बनवली जाते.
कुठं मिळते आयुर्वेदिक पाणीपुरी?
आयुर्वेदिक पाणीपुरीची मुख्य शाखा ही नाशिमधील सिडको परिसरात स्टेटबँक चौपाटी येथे आहे. तसेच कॉलेज रोड, गोविंदनगर येथे देखील झोम्पलस्टिक आयुर्वेदिक पाणीपुरी या नावाने दुकान आहे. तसेच इन्स्टापेजवरून ऑनलाईन देखील मागवता येऊ शकते, असेही दत्तू शेळके सांगतात.