ठाणे : सकाळच्या नाश्त्यासाठी मेदूवडा, इडली, उत्तपा, हे नाश्त्याचे पदार्थ सर्वांच्याच आवडीचे आहेत. ठाण्यात स्टेशन जवळच असेच एक नाश्त्याचे दुकान आहे, जिथं अगदी कमी पैशात अत्यंत चविष्ट असा नाश्ता मिळतो. निशी स्नॅक्स असे नाश्त्याच्या दुकानाचे नाव आहे.
याठिकाणी सकाळी सात ते सकाळी दहा वाजेपर्यंत नाश्त्यासाठी कायम कॉलेजच्या मुलांची आणि ऑफिसला जाणाऱ्यांची खूप गर्दी असते. इथे मिळणारा मेदुवडा हा सर्वांचा अत्यंत आवडता आहे. एका मेंदू वड्याची किंमत इथे फक्त 20 रुपये आहे. मेदू वड्याबरोबर इडली प्लेटची किंमतही 20 रुपये आहे.
advertisement
ठाण्यातील हे निशी स्नॅक्सचे नाश्त्याचे दुकान भाग्यश्री शेलार आणि भरत शेलार हे पती-पत्नी मिळून चालवतात. 4 वर्षांपूर्वी या दोघांनी मिळून या दुकानाला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांच्याकडे फक्त मेदुवडा, इडली हेच पदार्थ मिळायचे. परंतु आता त्यांच्याकडे उत्तप्पा, डोसा, पोहे, उपमा, ढोकळा हे पदार्थसुद्धा मिळतात. सकाळी 6 वाजता हे दुकान सुरू करण्यासाठी हे दोघेही पती-पत्नी पहाटे 3 वाजेपासूनच पदार्थ बनवायची तयारी करायला सुरुवात करतात.
' मी आणि माझ्या पतीने मिळून 4 वर्षांपूर्वी दुकानाची सुरुवात केली. कॉलेजच्या मुलांना आणि ऑफिसच्या लोकांना सकाळी सकाळी गडबडीत चांगला नाश्ता करून खाता येत नाही, म्हणूनच आम्ही स्वस्तात मस्त मेदुवडा आणि इडली आणि इतरही नाश्त्याचे पदार्थ इथे विकतो. सर्व सामान्यांच्या खिशाला परवडणारे पदार्थ विकण्याच्या विचारातून ही सुरुवात केली. आता आमचा व्यवसाय चांगला सुरू आहे,' असे निशी स्नॅक्सच्या दुकानदार भाग्यश्री शेलार यांनी सांगितलं.
याठिकाणी मिळतात घरासारखे पौष्टिक पोहे, दरही कमी अन् चवही भारी! हे आहे लोकेशन
या दुकानात मेदुवडा सोबतच इडली, उत्तप्पा, पोहे, उपमा, मिनी डोसा, डाळ वडा हे सगळे पदार्थ फक्त 20 रुपयांना मिळतात. मित्रांनो, जर तुम्हालाही हे स्वस्त आणि मस्त मेदुवडे आणि इतर नाश्त्याचे पदार्थ ट्राय करायचे असतील तर आवर्जून या ठाण्यातील निशी स्नॅक्स दुकानाला भेट द्या आणि गरमागरम खुसखुशीत मेदुवडे खाऊ शकतात.