TRENDING:

सर्व सामान्यांची दिवाळी होणार गोड, पूना मर्चंट चेंबरकडून 180 रुपये किलो चिवडा अन् लाडू

Last Updated:

सर्व सामान्यांची सुद्धा दिवाळी गोड व्हावी त्यांना ही दिवाळीचा फराळाचा आस्वाद घेता यावा यासाठी पूना मर्चंट चेंबर हे संपूर्ण शहरात हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाचे हे 37 वे वर्ष असून पुण्यात त्यांनी वाटपासाठी एकूण 22 केंद्र सुरु केली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्राची केदारी, पुणे
advertisement

पुणे : दिवाळी म्हंटल की फराळ हा आलाच आणि आपल्या समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना आपली दिवाळी आनंदात गोड साजरी करायची असते. अशा लोकांसाठी पुण्यातील पूना मर्चंट चेंबर हे स्वस्त दरात लाडू चिवडा उपक्रम राबवत आहे. सर्व सामान्यांची सुद्धा दिवाळी गोड व्हावी त्यांना ही दिवाळीचा फराळाचा आस्वाद घेता यावा यासाठी पूना मर्चंट चेंबर हे संपूर्ण शहरात हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाचे हे 37 वे वर्ष असून पुण्यात त्यांनी वाटपासाठी एकूण 22 केंद्र सुरु केली आहेत. यामध्ये रास्त दरात लाडू चिवडा वाटप ते करत आहेत.

advertisement

या उपक्रमाबद्दल माहिती देताना पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले यांनी सांगितले की, 37 वर्षापूर्वी 5000 हजार किलो लाडू आणि चिवडा बनवायला सुरुवात केली होती. आता याची व्याप्ती ही अडीच ते तीन लाख लाडू आणि चिवड्यापर्यंत पोहचली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि परदेशात पण याची मागणी वाढल्यामुळे गेले 10 दिवस झालं 150 आचारी 24 तास आणि 650 महिला तीन शिफ्ट मध्ये काम करत आहे. असे हजार लोक हे काम करत आहेत.

advertisement

दिवाळीत घर सजावटीसाठी आर्टिफिशियल फुलांच्या माळा, दादर मार्केटमध्ये 100 रुपयांपासून करा खरेदी

180 रुपये किलो चिवडा आणि 180 रुपये किलो लाडू आहे तर अर्धा किलोचे दर हे 95 रुपये इतके आहे. हे सगळे आचारी राजस्थान वरून येतात तर या महिला विविध भागातून येतात. काही येरवडा, मगरपट्टा या भागातील असून यांना या दहा दिवसात रोजगार उपलब्ध होतो. त्यामुळे त्यांची ही दिवाळी साजरी होते. या महिलांना घेताना यांच हेल्थ चेकअप केलं जातं. नख वाढली आहेत का, हातापायाला काही लागलं आहे, काही आजार नाही ना हे सगळं बघितलं जातं, असं प्रविण चोरबेले सांगतात.

advertisement

पुणे शहरामध्ये 22 ठिकाणी याची विक्री ही केली जात आहे. जेणेकरून लोकांना सहज पणे खरेदी करतात येईल. हे बनवण्यासाठीचा माल हा कंपनीमधून चांगल्या दर्जाचा घेतला जातो. त्यामुळे या मालाला पुणे नव्हे तर परदेशातून देखील मागणी असते, अशी माहिती माजी अध्यक्ष प्रविण चोरबेले यांनी दिली आहे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
सर्व सामान्यांची दिवाळी होणार गोड, पूना मर्चंट चेंबरकडून 180 रुपये किलो चिवडा अन् लाडू
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल