सातारा : व्यवसाय करत असताना कोणताच व्यवसाय लहान किंवा मोठा नसतो तसेच कोणतेच काम लहान वा मोठे नसते. व्यवसाय हा व्यवसाय असतो. समाजात भाजीपाला विक्री करणे, वडापाव विक्री करणारे, चहा विक्री करणे अथवा छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना फारशी प्रतिष्ठा समाजात दिली जात नाही. मात्र चहावाले, भाजी विक्रेते, वडापाव वाले, हे दिवसाला हजारोंची कमाई करून महिन्याला लाखो रुपये कमवत असतात. दिसण्यासाठी त्यांचा व्यवसाय जरी छोटा असला किंवा रस्त्यावर असला तरी ते रोजचे हजारो रुपये कमवतात. अशीच साताऱ्यात चंदू चहावाल्याने एक वेगळी क्रेझनिर्माण केली आहे. साताऱ्याचा चंदू चहावाला चांगला प्रसिद्ध झाला असून तो महिन्याला लाखोंची कमाई करतो.
advertisement
कशी झाली व्यवसायाची सुरुवात?
सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच शाहू स्टेडियम परिसरामध्ये चंदू चहाचे दुकान आहे. या चंदू चहाची सुरुवात 1972 मध्ये चंद्रकांत शिंदे यांच्या आजोबांनी केली होती. त्यानंतर काही काळानंतर चंद्रकांत शिंदे यांनी 1992 सालापासून आपल्या आजोबांचा चंदू चहा विक्रीचा व्यवसाय नव्या जोमाने नव्या उमेदीने सुरू केला. आजोबांनी जी चहाची चव ठेवली ती चव पुढे घेऊन आजपर्यंत ते व्यवसाय करत आहेत.
मिसळप्रेमी कोल्हापुरात थालीपीठ खायला गर्दी, महिला विकतेय तब्बल 13 प्रकार
दिवसाला शेकडो ग्राहक पितात चहा
व्यवसायात एकनिष्ठ, जिद्द, चिकाटी आणि एकनिष्ठता ठेवून त्यांनी आपल्या ग्राहकांवर जम बसवलाय. साताऱ्यातून त्याचबरोबर बाहेर गावातून आणि जिल्ह्यातून चहाचे टेस्ट घेण्यासाठी ग्राहक मोठ्या संख्येने येऊ लागले. ग्राहकांची वाढती संख्या म्हणून कॉलिटीमध्ये तीळभर देखील फरक न होऊन देता जशास तशी कॉलिटी कायम ठेवली. त्यामुळे दिवसाला शेकडो ग्राहक या ठिकाणी चहा पितात.
पुण्याची फेमस झडका भेळ, तिसरी पिढी जपतेय खास चव, आपण ट्राय केली का?
महिन्याला होतीय लाखोंची कमाई
या ठिकाणी चहाच्या एका कपाची किंमत 15 रुपये आहे. चंद्रकांत शिंदे हे रोजचे 2 हजारांहून अधिक चहाच्या कपांची विक्री करतात. त्यातून त्यांना 15 हजार रुपये दिवसाला निव्वळ नफा मिळतो. महिन्याचे लाखो रुपये ते चहाच्या माध्यमातून कमवत आहेत. चहाबरोबर ग्राहकांच्या जिभेचे चोचले पुरवण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. चहा विक्री करत त्यांनी वडापाव, भजी, मिसळ अशा वेगवेगळ्या फास्ट फूडची देखील विक्री करू लागले आहेत. यामुळे टपरीवर येणारा ग्राहक चहा पिऊन अत्यंत आनंदी होत असल्याचे चंद्रकांत शिंदे यांनी सांगितले आहे.





