पुण्याची फेमस झडका भेळ, तिसरी पिढी जपतेय खास चव, आपण ट्राय केली का?
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यात खवय्यांना आकर्षित करणारी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. गेल्या 76 वर्षांपासून ही भेळ विक्री सुरू असून यादव कुटुंबातील तिसरी पिढी आपला वारसा जपतेय.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : प्रत्येक शहराची वेगळी अशी खाद्य संस्कृती असते आणि काही ठिकाणं खवय्यांची आकर्षण केंद्रं असतात. पुण्याची खाद्य संस्कृतीही प्रसिद्ध आहे. येथील काही ठिकाणं ही खवय्यांना नेहमीच आकर्षित करतात. शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसरात असणारी झटका भेळ हे असंच एक ठिकाण आहे. भारताच्या स्वातंत्र्य काळात म्हणजेच 1947 साली सुरू झालेली ही भेळ प्रसिद्ध आहे. सध्या तिसरी पिढी आपला वारसा जपतेय. अनेक कलाकारही या भेळचे चाहते असून इथे नेहमीच खवय्यांची गर्दी असते.
advertisement
1947 मध्ये शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या परिसरात यदुनाथ यादव यांनी भेळ विक्री सुरू केली. त्यांची तिसरी पिढी म्हणजेच राधेश्याम जाधव हे सध्या झटका भेळ विकतात. रेल्वे स्टेशन परिसरात आल्यावर अनेकजण या भेळवर ताव मारतात. विशेष म्हणजे अनेक कलाकारही आवर्जून भेळ खाण्यासाठी इथं येतात. पूर्वी अभिनेते मकरंद अनासपुरे भेळ खायला यायचे, असं यादव यांनी सांगितलं.
advertisement
76 वर्षानंतर तीच चव कायम
1947 पासून आम्ही भेळ विकतोय. आमच्या आजोबांनी 1947 मध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. तेव्हापासून इथं ओली आणि सुकी भेळ विकतोय. त्यासाठी लागणारं साहित्य. घरीच बनवतो. आजोबांकडूनच भेळ बनवायला शिकलो. वयाच्या 96 वर्षांपर्यंत आजोबा स्वत: या ठिकाणी येत होते, असंही यादव सांगतात.
advertisement
35 रुपयांत मिळते भेळ
view commentsझटका भेळ येथे ओली आणि सुकी असे भेळचे पर्याय उपलब्ध आहेत. यात दोन तीन प्रकारच्या शेव, भेळ, कांदा कोथिंबीर आणि चिंचचे पाणी, चटणी टाकून ही भेळ बनवली जाते. ही भेळ 35 रुपये मध्ये मिळते. ही भेळ दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत सुरू असते, असेही राधेश्याम यादव सांगतात.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 04, 2024 5:43 PM IST

