कुठे मिळत आहे?
ठाण्याचा कोलबाड परिसरात असलेले मोमोज कॉर्नर नामक दुकानात युनिक फूड कुल्हड मोमो मिळत आहे. मंदार आणि साहिल मोरे ह्या दोन सख्या भावांनी आठ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या मोमोज कॉर्नर वर खवय्ये विविध प्रकारचे मोमोजचा आस्वाद घेण्यासाठी जमा होतात. सुरुवातीला एका छोट्या हात गाडीचा प्रवास आता वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे आउटलेट बनत असल्याचा सुरू आहे.
advertisement
मिल कामगाराच्या मुलानं लावला वडापावचा शोध, बाळासाहेब ठाकरेंपासून सचिनपर्यंत सर्वांनीच चाखलीय चव
कुल्हड मोमोचे वैशिष्ट्य?
मातीच्या कपात सर्वप्रथम तळून घेतलेले मोमो पहिले एका वाटीत अनेक सॉसेस सोबत मॅरीनेट करून त्यांना कुल्हडमध्ये टाकले जाते. त्यावर भरपूर चीज आणि वेगवेगळे मसाले टाकून शेवटी त्यावर कणसाचे दाणे घातले जातात. त्या फुलली लोडेड कुल्हडला पाच मिनिट ओवनमध्ये ठेवून गरम केले जाते. त्यानंतर त्या संपूर्ण कुल्हडला खवय्यांच्या हाती एका चमचा सोबत दिले जाते.
Oh, कोबीच्या पानात सर्व्ह केली जाते चायनीज भेळ; कुठं मिळेल?
हा चविष्ट कुल्हड मोमो या ठिकाणी 90 रुपये या किमतीत उपलब्ध आहे. येथील युनिक फूडमुळे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी करतो. मोमोज कॉर्नर या ठिकाणी मोमोजच्या अनेक व्हरायटी बरोबरच चायनीजचे राईस आणि नूडल्सचे प्रकार देखील अवघ्या पॉकेट फ्रेंडली किमतीत उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ मिळतात. उत्कृष्ट हायजिन पाळत खास शाकाहारी खवय्यांसाठी एक वेगळे किचन या ठिकाणी आहे. जेथे शाकाहारीसाठी वेगळे जेवणाचे सामान देखील वापरले जाते,अशी माहिती मोमोज कॉर्नरचे मालक मंदार मोरे यांनी दिली आहे.





