TRENDING:

पुण्यातील 135 वर्ष जुन्या वाड्यात मिळतोय वडापाव; रस्त्यासमोरून जाताना सुगंधानेच खावासा वाटेल!

Last Updated:

आंतरराष्ट्रीय वडापाव दिनाच्या निमित्तानं पुण्यातल्या 135 वर्ष जुन्या वाड्यातील वडापावाविषयी पाहूया विशेष रिपोर्ट

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे 23 ऑगस्ट : वडापाव आवडत नाही अशी व्यक्ती सापडणं अवघड आहे. वडापाव आवडतं नाही अशी व्यक्ती सापडणं मुश्किल आहे . वडापावचा जन्म मुंबईत झाला असला तरी संपूर्ण देशात हा पदार्थ तितकाच लोकप्रिय आहे. बटाट्याची भाजी आणि पोळी खाण्याच्या ऐवजी या भाजीचे गोळे बेसनात कालवून ते तेलान तळून बटाटेवडा बनवण्यास सुरूवात झाली. तेव्हापासून वडापाव हा प्रत्येकालाच आपला वाटतो. आज (23 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय वडापाव दिनाच्या निमित्तानं पुण्यातल्या 135 वर्ष जुन्या वाड्यातील वडापावाविषयी पाहूया विशेष रिपोर्ट
advertisement

पुण्यातील नारायण पेठ या ठिकाणी असलेल्या स्वतंत्रपूर्व काळातील म्हणजेच 135 वर्ष जुना निघोजकर वाडा आहे. या वाड्याच्या इतिहासाइतकाच तेथील वडापाव देखील लोकप्रिय आहे. नारायण पेठेच्या रस्त्यावरून जात असताना निघोजकर वाडा आला कि नाकावर या चमचमीत वडापावचा सुगंध येतो आणि हा वडापाव खाण्यासाठी पुणेकर या ठिकाणी वळतात.

एकाच ठिकाणी खा कोळशाच्या भट्टीवर भाजलेले 6 प्रकारचे वडापाव, पाहताच सुटेल तोंडाला पाणी

advertisement

वडापाव हे खरंतर सामान्यांचं फूड.खायला काही प्लेट लागत नाही ना चमचा. जितकं लवकर बनतो, तितक्याच लवकर खाल्लाही जातो. गेल्या ४ वर्षांपासून सोनाली बोंदार्डे आणि त्यांचे पती संदीप बोंदार्डे यांनी स्नॅक्स सेंटरचे व्यवस्थापन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अगदी कमी वेळेत हा वडापाव प्रचंड लोकप्रिय झाला .

135 वर्ष जुन्या वाड्यात संध्याकाळच्या मंद प्रकाशात वडापाव खाणं हे अनेक पुणेकरांसाठी रुटिन झालंय. सोनाली दिवसभर नोकरी करून इथं वडापाव विकतात. इथं मिळणाऱ्या गरमागरम वडापावला पुणेकरांनी चांगलंच प्रेम दिलं असं त्यांनी सांगितलं.

advertisement

Video: वडापावप्रेमी असाल तर इथे भेट द्याच! उलटा वडापाव आणि उपवासाचा वडा खाऊन बोटं चाटत बसाल

निघोजकर वाड्याचा इतिहास

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

नारायण पेठेतला निघोजकर वाडा हा घरगुती पदार्थांसाठी विशेषत: वडापाव आणि भजीसाठी ओळखला जातो. 1920 मध्ये हा वाडा दिनकर निघोजकर यांनी विकत घेतला. लग्न आणि इतर समारंभांसाठी त्यांनी अर्धा वाडा भाड्याने द्यायला सुरुवात केली. पुढे 1961 मध्ये पानशेत धरणाच्या पुरामुळे त्यांनी लग्नासाठी जागा भाड्याने देणे बंद केले. पण निघोजकर कुटुंब मागे हटले नाही! त्यांनी पुन्हा त्यांचा तळमजला भाग भाड्याने देण्यास सुरुवात केली, जरी यावेळी त्यांनी ते थिएटर, परफॉर्मिंग आर्ट्स रिहर्सलसाठी भाड्याने दिले. श्रीराम लागू, निळू फुले यांसारखे दिग्गज कलाकार देखील या वाड्याला नियमित भेट देत. या वाड्यामध्ये आजही नियमित नाटकांच्या तालिमी होतात.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
पुण्यातील 135 वर्ष जुन्या वाड्यात मिळतोय वडापाव; रस्त्यासमोरून जाताना सुगंधानेच खावासा वाटेल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल