तुम्ही माझे आदर्श आहात, कठोर परिश्रम आणि चिकाटी यशाकडे घेऊन जाते याचे तुम्ही प्रतीक आहात, तुम्हाला दीर्घायुष्य आणि खूप सुख लाभो...वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बॉस..!
आयुष्यात कुठलाही प्रसंग आला तरी त्याला हसतमुखाने सामोरे जाणे सोपे नाही, आयुष्याची 50 वर्षे आनंदात, उत्साहात व्यतीत केल्याबद्दल तुम्हाला अनेक शुभेच्छा...तुमच्या पुढील आयुष्यात आनंदाची भर पडत राहो हीच इच्छा...Happy 50th Birthday Boss...!
advertisement
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज होती, तेव्हा तू साथ दिलीस, माझ्या प्रत्येक संकटात ढाल होऊन उभा राहिलास, थँक्यू भावा माझी नेहमीच काळजी घेतल्याबद्दल...तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
तू मित्र नाही भाऊ आहे आपला, रक्ताचा नाही पण जीव आहे आपला...वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा...!
साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या, तोंड उघडल्यावर शिव्याच बोलणाऱ्या, पण मनाने साफ असणाऱ्या आमच्या मैत्रिणीला, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा...!
advertisement
काही माणसं स्वभावाने कशी का असेनात, मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात, अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही...म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे...वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा...!
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झालाय थोडा लेट, पण शुभेच्छा येतील तुला थेट, वाढदिवसाच्या लै लै शुभेच्छा...!
बॉसचा चमचा म्हणून आहे ज्याची ओळख, त्याचा आहे आज खास दिवस, वाढदिवसाच्या शुभेच्छा चमच्या...!
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 15, 2025 10:25 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Birthday Wishes: बॉसच्या चमच्यांपासून ऑफिसमधल्या खास मित्रांपर्यंत, सर्वांसाठी वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा!
