TRENDING:

Holi Wishes In Marathi : 'आली आली होळी, नवरंगांची घेऊन खेळी', मराठमोळ्या शुभेच्छा देऊन साजरे करा धूलिवंदन..

Last Updated:

Happy Holi 2024 Wishes in Marathi : महाराष्ट्रात सर्वत्र आज धूलिवंदन साजरे केले जात आहे. रंगांचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होय. लोक हा सण उत्साहात साजरा करतात. तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि सहकाऱ्यांना शुभेच्छा देऊन हा सण साजरा करू शकता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : वर्षातील सर्वात उत्साही भारतीय सण होळी आणि धूलिवंदन जवळ आले आहे. महाराष्ट्रात 24 मार्चला होळी आणि 25 मार्चला धूलिवंदन साजरे केले जाणार आहे. वसंत ऋतूच्या आगमनाचा आनंद आणि हिवाळा संपल्याचा आनंद घेण्यासाठी हा सण साजरा केला जातो. रंगांचा सण म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय होय. लोक एकमेकांना वेगवेगळ्या रंगात रंगवतात आणि सण उत्साहात साजरा करतात. तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना, नातेवाईकांना आणि सहकाऱ्यांना होळीच्या शुभेच्छा (Holi wishes in marathi) देऊन हा सण साजरा करू शकता.
News18
News18
advertisement

होळीच्या पवित्र अग्नीमध्ये,

जळून जाऊ दे दु:खाचे सावट,

आयुष्यात येऊ दे सुखाचे क्षण..

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

वाईटाचा होवो नाश,

आयुष्यात येवो सुखाची लाट..

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..(Holi wishes in marathi)!

होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे,

तुमच्या आयुष्यात येऊ दे,

आनंदाचे क्षण सारे..

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

advertisement

होळीच्या शुभमुहुर्तावर येऊ दे,

तुमच्या आयुष्यात आनंद,

होऊ दे स्वप्नपूर्ती,

मिळू दे आनंदी आनंद..

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळीच्या दिवशी करुन होलिका दहन,

संपवूया वाईट प्रवृत्ती

आणि आणूया आनंद..

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

कालबाह्य गोष्टी मनातून काढा,

मनात पेटवा आशेची आग,

होळीकडे मागा हीच इच्छा,

पूर्ण होवो तुमच्या सर्व अपेक्षा..

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

advertisement

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,

रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,

होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,

पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी

तुम्हाला व तुमच्या परिवाराला

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,

होळी पेटता उठल्या ज्वाळा,

दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,

सण आनंदे साजरा केला…

advertisement

क्षणभर बाजूला सारू

रोजच्या वापरातले वाईट क्षण,

रंग गुलाल उधळू आणि,

रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

भिजू दे रंग आणि अंग स्वच्छंद,

अखंड उडू दे मनि रंगतरंग,

व्हावे अवघे जीवन दंग,

असे उधळू आज हे रंग,

धुलिवंदन हार्दिक शुभेच्छा..(dhulivandan wishes in marathi)!

advertisement

प्रेम, आनंद, सौहार्द आणि

विश्वासाच्या रंगात रंगते होळी

रंगीत होळी आणि धुलीवंदनाच्या

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मत्सर, द्वेष, मतभेद विसरू

प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू,

अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे,

आली होळी आली रे…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

होळीच करायची तर

अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,

जातीयतेची, धर्मवादाची,

हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,

गर्वाची, दु:खाची होळी करा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा..!

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Holi Wishes In Marathi : 'आली आली होळी, नवरंगांची घेऊन खेळी', मराठमोळ्या शुभेच्छा देऊन साजरे करा धूलिवंदन..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल