बहुतेक जण नाश्ता करत नाही, जेवणाच्या वेळा पाळत नाहीत. रात्री जास्त खातात. पण यामुळे वजन कमी करणं आणखी कठीण होऊ शकतं. खरंतर, वजन कमी करण्यासाठी, तुम्ही रात्री काय खाता आणि किती खाता यावर लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
जिममध्ये तासनतास घाम गाळत असाल पण तरीही वजन कमी होत नसेल, तर तुमच्या जेवणातल्या काही गोष्टींमुळे तुमची सर्व मेहनत वाया जाऊ शकते.
advertisement
Skin Care : महागड्या फेसवॉशला करा बायबाय, चेहऱ्याच्या ग्लोसाठी वापरा या टिप्स
पांढरा भात आणि रिफाइंड कार्ब्स - भारतीय घरांमध्ये डाळ-भाताचे जेवण सामान्य आहे, पण पांढऱ्या भातात साधे कार्बोहायड्रेट्स आणि उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतं.
रात्री भात खाल्ल्यानं रक्तातील साखरेचं प्रमाण झपाट्यानं वाढू शकतं, ज्यामुळे चरबी साठवण्यास मदत होते. भाताशिवाय राहू शकत नसाल तर त्याचे प्रमाण मर्यादित करा.
तळलेले पदार्थ - समोसे, भजी, वडे, पुरी आणि कचोरी यांसारखे तळलेले पदार्थ रात्रीच्या वेळी शरीराला पचवणं खूप कठीण असतं. त्यात कॅलरीज जास्त असतात. रात्रीच्या जेवणात जड, तेलकट अन्न खाल्ल्यानं वजन तर वाढतंच, शिवाय आम्लपित्त आणि झोपेचा त्रासही होतो.
गोड पदार्थ आणि मिष्टान्न - रात्रीच्या जेवणानंतर अनेकांना गोड पदार्थांची इच्छा होते. पण रात्री साखर खाल्ल्यानं इन्सुलिनची पातळी वाढते. रात्री आपण कॅलरीज बर्न करत नसल्यामुळे, ही अतिरिक्त साखर पोटातील चरबी म्हणून साठवली जाते. गोड पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर गुळाचा एक छोटासा तुकडा किंवा फळाचा एक तुकडा खाण्याचा पर्याय निवडू शकता.
Diabetes : साखर, भात खाऊन मधुमेह होतो का ? मधुमेह होण्याची मूळ कारणं समजून घ्या
कॅफिन आणि सॉफ्ट ड्रिंक्स - जेवणासोबत किंवा नंतर सॉफ्ट ड्रिंक्स, सोडा किंवा कॉफी पिणं हे वजन कमी करण्यातला एक मोठा अडथळा आहे. सॉफ्ट ड्रिंक्समधे लिक्विड कॅलरीज आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं.
कॅफिनमुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. कमी झोपेचा थेट संबंध वजन वाढण्याशी आणि ताणतणावाशी आहे.
मैदा आणि फास्ट फूड - वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी रात्रीच्या जेवणात पिझ्झा, पास्ता, नूडल्स किंवा अगदी रिफाइंड पिठापासून बनवलेले ब्रेड खाणं ही एक मोठी चूक आहे. रिफाइंड पीठ फायबरमुक्त असतं आणि त्यामुळे पोटात जडपणा येतो. यामुळे चयापचय मंदावतं, ज्यामुळे कॅलरीज बर्न करणं कठीण होतं.
