आयुर्वेदानुसार, तीन दोष आहेत. वात, पित्त आणि कफ या शरीराचं नियमन करणाऱ्या तीन मूलभूत ऊर्जा आहेत, ज्यांचा थेट संबंध आपल्या आहाराशी असतो. हे तीन दोष संतुलित असतात, तेव्हा शरीर निरोगी आणि उत्साही वाटतं. पण, त्यांचं संतुलन बिघडलं, तर विविध शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे, कोणत्या चवी कोणते दोष वाढवतात आणि कोणत्या त्यांना शांत करतात, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
आयुर्वेदात अन्नाच्या सहा मुख्य चवी सांगितल्या आहेत: मधुर म्हणजे गोड, आमल म्हणजे आंबट, लवण म्हणजे खारट, कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे काढा. या चवींचा आपल्या शरीरातील दोषांवर वेगवेगळा परिणाम होतो.
वात दोष - वात दोष वाढवणाऱ्या चवींमधे तिखट, कडू आणि तुरट चवींचा समावेश होतो. जास्त प्रमाणात तिखट किंवा कडू पदार्थांमुळे वात वाढू शकतो. यामुळे गॅसेस होणं, कोरडेपणा, अस्वस्थता किंवा सांधेदुखी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. वात संतुलित ठेवण्यासाठी गोड, खारट आणि आंबट चवी फायदेशीर मानल्या जातात. उष्ण आणि किंचित तेलकट पदार्थ खाल्ल्यानंही वात शांत होण्यास मदत होते.
पित्त दोष - पित्त हे शरीरातील उष्णता आणि पचनशक्तीशी संबंधित मानलं जातं. मसालेदार, आंबट आणि खारट चवींनी पित्त वाढू शकतं. जास्त मसालेदार किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यानं शरीरातील उष्णता वाढून आम्लपित्त, जळजळ, खाज किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. पित्त शांत करण्यासाठी गोड, कडू आणि तुरट चवी अधिक चांगल्या मानल्या जातात.
Time Management : कमी वेळात होतील अधिक कामं, पाच सवयींमुळे वाढेल कामांची गुणवत्ता, श्रमही वाचतील
हिरव्या भाज्या आणि फळं यांसारखे थंड आणि हलके पदार्थ पित्त संतुलित ठेवण्यास मदत करतात.
कफ दोष - कफ दोष शरीराचं स्थैर्य, आर्द्रता आणि शक्ती यांच्याशी संबंधित आहे. गोड, खारट आणि आंबट चवी कफ वाढवू शकतात. या चवींचं अतिसेवन केल तर जडपणा, आळस, वजन वाढणं किंवा कफ होऊ शकतो. तिखट, कडू आणि तुरट चवी कफ कमी करण्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. सौम्य, उष्ण आणि थोडं मसालेदार जेवण कफ संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात.
