TRENDING:

Heart Disease : धमन्यांमधले अडथळे ठरु शकतात जीवघेणे, या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात

Last Updated:

धमन्यांच्या प्रवाहात अडथळा येण्याची म्हणजेच artery blockage ची चिन्हं अनेकदा सूक्ष्म असतात की एखाद्या व्यक्तीला ती लक्षातही येत नाहीत. बऱ्याचदा, लोक ही लक्षणं किरकोळ समजून दुर्लक्ष करतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधे अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, धमनी ब्लॉकेजचे संकेत देणारी चिन्हं ओळखणं महत्वाचं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : Artery म्हणजेच धमनी ब्लॉक झाली असली तर, हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येऊ शकतो. पण अनेकदा एखाद्या व्यक्तीला हा तीव्र त्रास होईपर्यंत धमनी ब्लॉक झाल्याचं कळतही नाही. त्याआधीही, कोणतीही लक्षणं जाणवत नसल्यानं त्यांना बरं वाटत असतं.
News18
News18
advertisement

रक्तवाहिन्या पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त ब्लॉक झाल्या तरी शरीरात कोणतीही गंभीर लक्षणं दिसून येत नाहीत. धमन्यांच्या प्रवाहात अडथळा येण्याची म्हणजेच artery blockage ची चिन्हं अनेकदा सूक्ष्म असतात की एखाद्या व्यक्तीला ती लक्षातही येत नाहीत. बऱ्याचदा, लोक ही लक्षणं किरकोळ समजून दुर्लक्ष करतात, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधे अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणूनच, धमनी ब्लॉकेजचे संकेत देणारी चिन्हं ओळखणं महत्वाचं आहे. या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.

advertisement

Skin Care: कोरड्या हवेचं घेऊ नका टेन्शन, या टिप्स वापरा, मुरुम होतील गायब

रक्तवाहिन्या बंद पडल्याचे मूक संकेत -

थकवा - आंघोळ करणं, कपडे बदलणं किंवा अगदी थोडं चालणं यासारख्या दैनंदिन कामांमुळे खूप थकवा येत असेल, तर हे चिंतेचं कारण आहे. रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तेव्हा हृदयाला शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी जास्त काम करावं लागतं. याचा थेट परिणाम ऊर्जेच्या पातळीवर होतो आणि व्यक्तीला सतत थकवा जाणवू शकतो.

advertisement

छातीत दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं - छातीत दुखणं किंवा अस्वस्थ वाटणं हे हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याचं एक प्रमुख लक्षण आहे. याच्या वेदना नेहमीच तीव्र असतीलत असं नाही. अनेकदा जडपणा, जळजळ, दाब, घट्टपणा किंवा छातीत फुगणं अशी चिन्हं जाणवू शकतात. ही अस्वस्थता सहसा शारीरिक किंवा भावनिक ताणादरम्यान उद्भवते आणि विश्रांती घेतल्याने कमी होते.

advertisement

श्वास घेण्यास त्रास - हलकं काम करताना, पायऱ्या चढताना किंवा अंथरुणावर पडताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हृदयविकाराचं लक्षण असू शकतं. रक्तवाहिन्यांमधे अडथळा निर्माण झाल्यामुळे हृदय फुफ्फुसांमधून शरीरात रक्त योग्यरित्या पंप करू शकत नाही, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

Cortisol : कॉर्टिसोल म्हणजे काय ? कॉर्टिसोल वाढल्यानं काय होतं ?

advertisement

चक्कर येणं किंवा डोकं हलकं होणं - मेंदूला अपुरा रक्तपुरवठा झाल्यामुळं चक्कर येऊ शकते. अचानक उभं राहिल्यानंतर किंवा थोडंसं काम करूनही चक्कर येत असेल तर ते दुर्लक्ष करु नका.

हात आणि पाय थंड होणं - विशेषतः चालताना पायांमधे वेदना जाणवणं, पेटके येणं किंवा सुन्नपणा येणं या लक्षणांकडेही दुर्लक्ष करु नका.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शरिरासाठी पौष्टिक, हिवाळ्यात बनवा अंबाडीच्या फुलांची चटणी, चव अतिशय टेस्टी
सर्व पहा

जखम हळूहळू बरी होणं - पाय किंवा घोट्यांवरील जखमा ज्या बरं होण्यासाठी नेहमीच्या तुलनेत जास्त वेळ  लागतो असं लक्षात आलं तर रक्ताभिसरण खराब होण्याचं ते लक्षण आहे. ब्लॉक झालेल्या धमन्यांमुळे, पोषक घटक आणि ऑक्सिजनची योग्य मात्रा त्या भागात पोहोचत नाही, ज्यामुळे ऊतींच्या दुरुस्तीची प्रक्रिया मंदावते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Disease : धमन्यांमधले अडथळे ठरु शकतात जीवघेणे, या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल