त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक उपाय केले जातात. यातलाच एक उपाय म्हणजे तुरटी. चेहऱ्यावर तुरटी योग्यरित्या लावली तर त्वचा उजळते, डाग कमी होतात आणि त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते. तुरटी पारदर्शक स्फटिकासारखी दिसते.
Papaya : उन्हाळ्यात अशी घ्या पोटाची काळजी, पचनक्रिया राहिल ठणठणीत
आयुर्वेदिक गुणधर्मांसाठी तुरटी ओळखली जाते. तुरटीमुळे त्वचेची जळजळ कमी होते. पहिल्यांदाच तुरटी लावत असाल तर एकदा पॅच टेस्ट करणं आवश्यक आहे.
advertisement
- तुरटी लावण्याचा एक मार्ग म्हणजे गुलाब पाण्यात किंवा साध्या पाण्यात विरघळवून तुरटीची पावडर चेहऱ्यावर लावणं
Heatwave : उन्हाळा वाढतोय, तब्येत सांभाळा, तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष द्या
- तुरटी हळदीत मिसळून चेहऱ्यावर लावता येते. यासाठी एक चमचा तुरटी पावडरमध्ये अर्धा चमचा हळद आणि थोडं पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनंतर धुवा.
- त्वचेचा पोत मऊ ठेवण्यासाठी चेहऱ्यावर तुरटी आणि मध लावू शकता. यासाठी एक चमचा तुरटी पावडर एक चमचा मधात मिसळा आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस घाला आणि पेस्ट बनवा. वीस ते तीस मिनिटं चेहऱ्यावर लावल्यानंतर हलक्या हातानं धुवा. यामुळे त्वचा मऊ होते.