Summer Care : टोमॅटो, मध, बेसन - टॅनिंग कमी करण्यासाठी सुपरकुल फंडा
यासाठी प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर मंजू मित्तल यांनी एक माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. वारंवार पाणी पिऊनही तहान लागत असेल, तर हा उपाय नक्की वापरून पाहू शकता. यासाठी, एक चमचा बडीशेपेमध्ये थोड्या प्रमाणात साखर मिसळा आणि हे मिश्रण हळूहळू चावून खा. असं केल्यानं लगेचच घशात थंडावा जाणवेल आणि तोंडही कोरडं वाटणार नाही.
advertisement
Summer Care : उन्हाळ्यात यकृताचं आरोग्य जपा, थंड पेयांचं अतिसेवन ठरु शकतं धोक्याची घंटा
बडीशेप
बडीशेपमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात. या घटकामुळे तोंडात लाळेचा प्रवाह उत्तेजित होतो. यामुळे तोंड आणि घसा वारंवार कोरडे होत नाही. याशिवाय, बडीशेप खाल्ल्यानं तोंडाच्या कोरडेपणामुळे येणारी दुर्गंधी देखील दूर होते.
खडी साखर
खडी साखरेचा गोडवा घशाला आराम आणि थंडावा देतो. ज्यामुळे घसा कोरडा झाल्यावर जळजळ होण्याची समस्या येत नाही. त्यामुळे घसा कोरडा पडेल तेव्हा हा सोपा उपाय करून पाहू शकता किंवा बराच वेळ बाहेर राहणार असाल तर एका छोट्या डबीत बडिशेप आणि खडी साखर एकत्र करुन ठेवा. उन्हाळ्यात बाहेर गेलात तर याचा नक्की उपयोग होईल.