यासाठी, स्वयंपाकघरात हमखास मिळणाऱ्या दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे जिरं आणि दुसरा जिन्नस म्हणजे लिंबू. मसालेदार जिऱ्यानं अन्नाचा सुगंध आणि चव तर वाढतेच, तर लिंबामुळे शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत होते. हे दोन्ही जिन्नस योग्य प्रमाणात खाणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
पाण्यात जिरं आणि लिंबू मिसळून, रिकाम्या पोटी प्यायल्यानं पाच आरोग्य समस्यांवर उत्तर मिळेल. या दोन
advertisement
जिन्नसांमुळे,पोटाच्या समस्या, हार्मोनल असंतुलन, वजन कमी करणं, मुरुम या समस्या कमी होतील.
Gut Health : आतडी मजबूत ठेवण्यासाठी हे पदार्थ टाळा, ऐका डॉक्टरांचा सल्ला
पोटाच्या समस्या
चौदा दिवस रिकाम्या पोटी जिऱ्याचं पाणी लिंबू मिसळून प्यायल्यानं पचनसंस्थेला फायदा होईल. यामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होईल. गॅस, अपचन, आम्लपित्त आणि अपचनाची समस्या यामुळे हळूहळू कमी होते आणि पचन निरोगी होण्यासाठी मदत होईल.
यासोबतच, जिऱ्यात असलेले घटक पाचक एंजाइम सक्रिय करून पचन सुधारण्यास मदत करू शकतात. यामुळे पोट फुगण्याच्या समस्येपासूनही आराम मिळेल.
हार्मोनल असंतुलन
चौदा दिवस रिकाम्या पोटी जिरं आणि लिंबू मिसळलेलं पाणी प्या. यामुळे शरीरातील हार्मोनल असंतुलन दूर होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
जिरं आणि लिंबू मिसळलेलं पाणी सलग दोन आठवडे प्यायल्यानं वजन कमी करण्यास देखील मदत करू शकते. या पाण्यानं चयापचय वाढण्यास मदत होते, ज्यामुळे चरबी सहज बर्न होण्यास मदत होते. म्हणून, हे पाणी प्यायल्यानं वजन कमी होण्यास देखील मदत होते.
Diet : वयानुसार खाणं गरजेचं, आजार राहतील दूर, प्रकृती राहिल ठणठणीत
मुरुमांची समस्या
चौदा दिवस रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यानं मुरुमांच्या समस्येपासून मुक्तता मिळू शकते. लिंबातलं व्हिटॅमिन सी आणि जिऱ्यातले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म रक्त स्वच्छ करण्यास मदत करतात. यामुळे मुरुमांची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
पोट स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त
सकाळी रिकाम्या पोटी मलासनात बसून हे पाणी प्यायलं तर ते पोट सहज स्वच्छ होण्यास मदत होऊ शकते आणि पोटाची चरबी देखील कमी करू शकते.
