उन्हाळ्यात चेहरा घामट होतो आणि चिकट वाटतो. अनेक सौंदर्य तज्ज्ञ चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा सल्ला देतात. बर्फ लावल्यानं सूज आणि जळजळ कमी होते.
Homemade Facewash : घरगुती फेसवॉशनं घ्या चेहऱ्याची काळजी, त्वचा होईल स्वच्छ आणि मुलायम
अनेक सेलिब्रिटी देखील चेहऱ्यावर बर्फ लावतानाचे व्हिडिओ आणि स्किन केअरबद्दल टिप्स देत असतात. बर्फामुळे सूज आणि जळजळ कमी होते. चेहऱ्यावर दररोज बर्फ लावल्यानं त्वचा ताजीतवानी आणि चमकदार दिसते.
advertisement
फेस आयसिंग योग्यरित्या केलं नाही तर ते फायद्याऐवजी नुकसानकारक ठरू शकतं. पाहूया चेहऱ्यावर बर्फ लावण्याची योग्य पद्धत - सर्वप्रथम, चेहरा नीट धुवा. हातही स्वच्छ आहेत याची खात्री करुन घ्या. स्वच्छ टॉवेल किंवा टिश्यूच्या मदतीनं चेहरा पुसून कोरडा करा. यानंतर, एक सुती कापड घ्या आणि त्यात बर्फाचा तुकडा घाला आणि नंतर हळूहळू चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावर बर्फाचे तुकडे सुमारे एक मिनिट फिरवा.
Garlic : कोलेस्ट्रॉल नियंत्रण, हृदयाच्या आरोग्यासाठी खा लसूण, रक्तप्रवाह राहिल सुरळीत
बर्फ जास्त काळ चेहऱ्यावर लावणं टाळा. कारण यामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. याशिवाय काकडीचा रस, कोरफड, ग्रीन टी पाण्यात मिसळून त्या पाण्याच्या बर्फानं मसाज करु शकता. यामुळे त्वचेला अधिक फायदा होईल. या मसाजमुळे त्वचा हायड्रेट होईल आणि मुरुम तसंच मुरुमांचे डाग कमी होतील.