भारतीय घरांत चहा तर रोजच होतो. चहा पिऊन झाल्यावर उरलेली चहा पावडर / पत्ती टाकण्याऐवजी चेहरा आणि केसांसाठी स्क्रब बनवता येईल. या चहा पत्तीचा उपयोग त्वचा, केस आणि घरगुती कारणांसाठी केला जाऊ शकतो.
Skin Care Routine : उन्हापासून करा चेहऱ्याचं रक्षण, त्वचेचं आरोग्य जपण्यासाठीच्या सोप्या टिप्स
स्क्रब
चहा झाल्यानंतर उरलेली चहा पावडर किंवा चहा पत्ती पाण्यानं धुवा. आता त्यात एक चमचा मध घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर एक ते दीड मिनिट चोळा आणि नंतर धुवा. चहाच्या पानांचा हा स्क्रब त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठी प्रभावी आहे. हा स्क्रब डोक्याच्या पृष्ठभागावर म्हणजेच टाळूवरही लावता येते. टाळूवर घासल्यानं डेड स्किन निघून जाते आणि कोंडाही कमी होतो.
advertisement
खत
उरलेली चहा पावडर / पत्ती वनस्पतींसाठी खत म्हणून वापरली जाऊ शकते. चहाची पानं उत्तम कंपोस्ट आणि खत म्हणून काम करतात. टोमॅटो, गुलाब आणि मनी प्लांटमध्ये याचा उपयोग जास्त होतो. चहाची पानं वाळवून बागेत टाकली तर झाडांमध्ये बुरशी येत नाही.
Curd : मध, हळद, दही खाण्याचे फायदे, त्वचेसह संपूर्ण प्रकृतीसाठी लाभदायक
स्वच्छतेसाठी उपयुक्त
चहा बनवल्यानंतर उरलेली चहापत्ती स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी वापरता येतात. विशेषत: लाकडी पृष्ठभाग यामुळे चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो. वापरलेली चहाची पानं पाण्यात टाका आणि या पाण्यात भिजवून कापडानं स्वच्छ करा.
सनबर्नवर टी बॅगचा वापर
चहा बनवण्यासाठी टीबॅग वापरली असेल, तर ही टीबॅग फेकून देऊ नका. उन्हामुळे त्वचेवर जळजळ वाटते त्यावर लावण्यासाठी टीबॅगचा वापर करा. सनबर्नवर ओल्या टीबॅग लावल्यानं त्वचेला आराम मिळतो. एखादा किडा चावला असेल आणि त्वचेवर जळजळ होत असेल तर तिथे टीबॅग लावा. यामुळे जळजळ आणि संसर्ग कमी होतो.