या नैसर्गिक पदार्थांमुळे चेहऱ्यावर फेशियल केल्यासारखी चमक येईल. घरी दही आणि डाळीच्या पिठापासून बनवलेला फेस पॅक लावल्यानं चेहऱ्यावरील टॅनिंगचा थर निघून टाकतो आणि त्वचा चमकदार होण्यासाठी मदत होते. उन्हाळ्यामुळे होणारं टॅनिंग आणि त्वचेवरचे काळे डाग दूर करण्यासाठी, हा फेस पॅक उपयोगी ठरतो. दही वापरुन बनवलेल्या फेस पॅकमुळे चेहऱ्यावर साचलेल्या धुळीचा थर निघतो आणि यामुळे त्वचेला हायड्रेशन देखील मिळतं.
advertisement
Summer Care : कडक उन्हाळा आणि गारेगार काकडी, उन्हाळा होईल सुसह्य, डोळे, केसांसाठीही फायदेशीर
दही आणि डाळीच्या पिठाचा फेस पॅक
दही आणि डाळीचं पीठ वापरून चांगला फेस पॅक बनवता येतो. हा फेस पॅक बनवण्यासाठी, आवश्यकतेनुसार दोन चमचे बेसन आणि दही मिसळा. हे मिश्रण एकजीव करा आणि चेहऱ्यावर लावा. काही वेळ ठेवल्यानंतर चेहरा धुवा. या फेस पॅकमुळे टॅनिंगचं प्रमाण कमी होतं आणि चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जातात. हा पॅक चेहऱ्यावर तसंच मानेवर आणि घशावर लावा.
दही आणि हळदीचा फेस पॅक
दही आणि हळद पावडर मिसळून हा फेस पॅक बनवला जातो. दोन चमचे दह्यात अर्धा चमचा हळद मिसळून पेस्ट तयार करा. दहा ते पंधरा मिनिटं चेहऱ्यावर लावल्यानंतर ते धुवून काढा. हा फेसपॅक जास्त वेळ लावू नका, अन्यथा चेहऱ्यावर पिवळेपणा येऊ शकतो. दाहक विरोधी आणि जीवाणूंच्या वाढीला प्रतिबंध करणारे गुणधर्म असल्यानं हा फेस पॅक त्वचेसाठी फायदेशीर ठरतो.
Summer Care : त्वचेच्या संरक्षणासाठी वापरा सनस्क्रीन लोशन, घरी झटपट लोशन बनवण्याची कृती
दही आणि मध
दही आणि मध वापरुन तयार केलेल्या फेस पॅकमुळे चेहरा चमकदार होतो. यामुळे त्वचेला पुरेसा ओलावा देखील मिळतो. फेस पॅक बनवण्यासाठी, दही आणि मध समान प्रमाणात मिसळा आणि ते लावा. हा फेस पॅक विशेषतः कोरड्या आणि संवेदनशील त्वचेसाठी चांगला आहे.
दही आणि कोरफड
त्वचेला थंडावा देण्यासाठी हा फेस पॅक परिणामकारक आहे. या फेसपॅकमुळे उन्हामुळे होणारं टॅनिंग कमी होऊ शकतं. यासाठी कोरफडीचा ताजा गर वापरू शकता किंवा दह्यात तयार कोरफडीचा गर मिसळू शकता. दही आणि कोरफड मिसळा, पंधरा मिनिटं चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.