भारतात मृत्यूचं प्रमाण खूप जास्त
'टाईम्स ऑफ इंडिया'च्या बातमीनुसार, ICMR च्या नवीन अभ्यासात असं म्हटलं आहे की भारतात सुमारे 65% कॅन्सर रुग्णांचा मृत्यू होतो. हे प्रमाण खूप जास्त आहे, कारण चीनमध्ये कॅन्सरमुळे मृत्यूचं प्रमाण 50% आहे, तर अमेरिकेत ते 23% आहे. याचा अर्थ, भारतात कॅन्सरचं निदान झाल्यानंतरही पाचपैकी तीन लोक जीव गमावत आहेत. ICMR चा हा अभ्यास 'द लॅन्सेट रिजनल-साऊथईस्ट एशिया जर्नल'मध्ये प्रकाशित झाला आहे. जगात कॅन्सर रुग्णांची संख्या चीनमध्ये सर्वात जास्त आहे. अमेरिका या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात दरवर्षी लाखो लोक कॅन्सरमुळे मरतात आणि ही संख्या सतत वाढत आहे.
advertisement
आकडेवारी काय सांगते?
ICMR चा हा अभ्यास ग्लोबोकॅन 2022 च्या डेटाच्या विश्लेषणावर आधारित आहे. हे 185 देशांतील कॅन्सर डेटा प्रदान करणारे एक ऑनलाइन डेटाबेस आहे. ICMR म्हणतं की, मुलांमध्ये (0-14 वर्षे) आणि तरुणांमध्ये (15-49 वर्षे) कॅन्सर होण्याचं प्रमाण 0.1% ते 2.3% आहे. तर, यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 0.08% ते 1.3% आहे. मध्यम वयात (50-69 वर्षे) आणि वृद्धापकाळात (70 वर्षे किंवा त्याहून अधिक) कॅन्सर होण्याचा धोका 8.3% ते 10.3% आहे. यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 5.5% ते 7.6% आहे. गेल्या दोन दशकांत भारतात कॅन्सरमुळे मृत्यूचं प्रमाण वाढत आहे, असंही या अभ्यासात म्हटलं आहे.
भविष्यात काय होणार?
शास्त्रज्ञांनी अंदाज वर्तवला आहे की, येत्या काही वर्षांत कॅन्सरचे रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण वाढत राहील. 2022 ते 2050 पर्यंत, मृत्यूचं प्रमाण 64.7 वरून 109.6 पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ICMR ने इशारा दिला आहे की, येत्या काळात कॅन्सर नियंत्रणात आणण्यासाठी भारताला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. कॅन्सरचे वाढते रुग्ण आणि मृत्यूचं प्रमाण लक्षात घेता, केंद्र सरकारने 2025-26 च्या अर्थसंकल्पात देशातील सर्व 759 जिल्ह्यांमध्ये डे केअर कॅन्सर सेंटर सुरू करण्याची योजना आखली आहे. जिथे केमोथेरपी, आवश्यक औषधे आणि बायोप्सी सेवा उपलब्ध असतील.
हे ही वाचा : Soaked Raisins : सकाळी रिकाम्या पोटी प्या भिजवलेल्या बेदाण्यांचं पाणी, प्रकृतीसाठी भरपूर फायदेशीर
हे ही वाचा : सतत पोट दुखतंय, 'हा' गंभीर आजार तर झाला नाही ना? डाॅक्टरांनी सांगितली लक्षणं अन् उपचार!