TRENDING:

Summer Skin Care : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, क्रिम नाही आधी पोटाचं आरोग्य तपासा

Last Updated:

उन्हाळ्यात चेहऱ्यावर मुरुम येत असतील तर मुरुमांसाठी क्रिम शोधण्याआधी पोटाचं आरोग्य योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो, यातच मुरुमांच्या समस्येचं खरं कारण आहे. मुरुम फक्त त्वचेवर दिसत असले तरी तुमच्या शरीरात सुरू असलेल्या काही समस्यांचं ते लक्षण देखील असू शकतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्यात घामामुळे त्वचा चिकट, तेलकट होते. अशा त्वचेवर मुरुम येण्याची शक्यता जास्त असते. तुम्हालाही उन्हाळ्यात मुरुमांचा त्रास होत असेल तर ही माहिती महत्त्वाची. मुरुमांसाठी क्रिम शोधण्याआधी पोटाचं आरोग्य योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे. उन्हाळ्यात हलका आहार घेण्याचा सल्ला दिला जातो, यातच मुरुमांच्या समस्येचं खरं कारण आहे.
News18
News18
advertisement

मुरुम फक्त त्वचेवर दिसत असले तरी तुमच्या शरीरात सुरू असलेल्या काही समस्यांचं ते लक्षण देखील असू शकतात. तुमचं पोट शांत असेल तर चेहऱ्यावर मुरुम येणार नाहीत आणि असतील तर हळूहळू त्याचं प्रमाण कमी होईल. चेहऱ्यावर येणारे मुरुम हे नेहमीच बाह्य कारणांमुळे येत नाहीत. धूळ, तेलकट त्वचा किंवा खाण्याच्या चुकीच्या सवयी ही त्यामागची कारणं असू शकतात. त्वचा वारंवार खराब होत असेल तर त्याचं खरं कारण बऱ्याचदा आपल्या पोटाशी संबंधित असतं. मुरुम, पुरळ किंवा खाज सुटणं यासारखी लक्षणं यामुळे दिसतात. म्हणून पोटाच्या आरोग्याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे.

advertisement

पोटाच्या समस्या -

आपल्या शरीराचा प्रत्येक भाग कोणत्या ना कोणत्या प्रकारे एकमेकांशी जोडलेला असतो, विशेषतः पोट आणि त्वचेचं नातं खूप खोलवर असतं.

Summer : झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा तुरटी, उन्हाळ्यातही चेहर दिसेल टवटवीत

जर पोटात राहणारे बॅक्टेरिया संतुलित नसतील तर त्याचा परिणाम थेट आपल्या त्वचेवर दिसून येतो. या जीवाणूंमुळे त्रास होत असेल तर शरीरात जळजळ वाढते. ज्यामुळे चेहऱ्यावर मुरुम आणि पुरळ उठतं. पोटाच्या समस्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. अन्न नीट पचलं नाही, पोटात वारंवार गॅस होत असतील, आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठतेची समस्या असेल, तर ही सर्व लक्षणं म्हणजे शरीर आतून योग्यरित्या कार्य करत नसल्याची आहेत.

advertisement

त्वचेवर परिणाम -

शरीरात वाईट बॅक्टेरिया वाढतात तेव्हा शरीराची संरक्षण प्रणाली कमकुवत होते. ज्यामध्ये पोटाचे थर सैल होतात आणि बॅक्टेरिया रक्तात प्रवेश करतात आणि त्वचेवर परिणाम करतात. यामुळे चेहऱ्यावर मुरुम, पुरळ, खाज सुटणं किंवा त्वचेचा रंग बिघडणं यासारख्या समस्या दिसू लागतात.

Papaya : उन्हाळ्यात अशी घ्या पोटाची काळजी, पचनक्रिया राहिल ठणठणीत

advertisement

संतुलित आहार -

त्वचेच्या समस्येवर सतत उपचार घेत असाल पण कोणताही परिणाम दिसत नसेल, तर पोट तपासणं देखील महत्त्वाचं आहे. फायबरयुक्त पदार्थ, दहीसारखे प्रोबायोटिक्स आणि ताजी फळं आणि भाज्या खाल्ल्यानं आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते. या टिपचा उपयोग एरवीही आणि उन्हाळ्यात अधिक होतो. दह्याचं ताक हे उन्हाळ्यातलं उत्तम पेय आहे.

advertisement

उन्हाळ्यात पोटाचं आरोग्य जपण्यासाठी टिप्स -

जास्त तळलेलं अन्न, साखरयुक्त पदार्थ आणि फास्ट फूडपासून दूर राहणं महत्त्वाचं आहे. भरपूर पाणी पिणं, वेळेवर झोपणं आणि ताण व्यवस्थापन यामुळेही पोट आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Skin Care : उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी, क्रिम नाही आधी पोटाचं आरोग्य तपासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल