केस गळती रोखण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरु शकतात, त्यांचा वापर असा करावा याबाबत तज्ज्ञांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यामुळे केस गळतीची चिंता सोडा. मेथीमध्ये आढळणारे गुणधर्म केसांच्या वाढीला चालना देतात. डोक्यातील कोंडा आणि केस तुटणं रोखण्यासाठी मेथीचे दाणे उपयुक्त ठरतात.
Walnut : आरोग्यासाठी फायदेशीर अक्रोड, मेंदू, हृदय, त्वचेसाठीही उपयुक्त
advertisement
केसांसाठी मेथीचे फायदे -
मेथीचे दाणे केसांना मजबूत, जाड आणि चमकदार बनवण्यास मदत करतात. प्रथिनं आणि निकोटिनिक अॅसिडमुळे केस आतून मजबूत होतात आणि केस गळतीची समस्या कमी होते. मेथीच्या दाण्यांमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात, कोंड्यामुळे होणाऱ्या बुरशीला किंवा संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी हा गुणधर्म उपयुक्त ठरतो.
Vitamins Deficiency : सतत झोप, आळस येत असेल तर सावध व्हा, जीवनसत्त्वांची कमतरता असू शकतं कारण
केस गळती रोखण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा वापर -
केसांच्या आरोग्यासाठी मेथीचं तेल वापरू शकता. हे तेल बनवण्यासाठी, प्रथम एका भांड्यात नारळाचं तेल घ्या आणि त्यात मेथीचे दाणे घाला आणि ते उकळू द्या. मेथीचे दाणे उकळून चांगले शिजले की, तेल गॅसवरून काढून बाजूला ठेवा. तेल थोडं थंड झाल्यावर या तेलानं केसांमध्ये मालिश करा आणि काही वेळ तसंच राहू द्या. नंतर सौम्य शॅम्पूनं केस धुवा. मेथीच्या दाण्यांचा वापर आठवड्यातून दोनदा करू शकता.