TRENDING:

Curd : मध, हळद, दही खाण्याचे फायदे, त्वचेसह संपूर्ण प्रकृतीसाठी लाभदायक

Last Updated:

मध आणि हळद मिसळून दही खाण्याचा हा घरगुती उपाय आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. यामुळे प्रतिकारशक्ती मजबूत होते तसंच पचन आणि त्वचेसाठीही हे मिश्रण फायदेशीर आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या आहार आणि आरोग्यासाठी दही खूप महत्वाचं आहे. दही स्वादिष्ट असतंच आणि आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आयुर्वेदातही दह्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. मध आणि हळद मिसळून दही खाण्याचा हा घरगुती उपाय आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.
News18
News18
advertisement

1. मध

मध आणि दही यांचं मिश्रण आरोग्यासाठी सुपरफूड आहे. या मिश्रणामुळे पचनसंस्था मजबूत राहते. मधातले अँटीबॅक्टेरियल गुणधर्म दह्याच्या प्रोबायोटिक्ससोबत रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतात. या मिश्रणामुळे शरीरातील चयापचयाचा वेग वाढतो आणि वजन कमी करण्यासाठीही उपयोग होतो.

Dandruff : केसांतल्या कोंड्यावर नैसर्गिक उपाय, हे उपाय करुन पाहा, कोंडा होईल दूर

advertisement

2. हळद

दह्यासोबत हळदीचे औषधी गुणधर्म हे एक शक्तिशाली हेल्थ टॉनिक आहे. हळदीमध्ये कर्क्यूमिन असतं, ज्यामुळे शरीरातील जळजळ कमी होते. दही आणि हळद हे मिश्रण शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. हे मिश्रण त्वचेला आतून पोषण देते आणि ती निरोगी आणि चमकदार बनवते.

दही, मध, हळद खाण्याचे फायदे -

advertisement

पचन सुधारतं - या मिश्रणामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं आणि अपचन, बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात.

रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त : मध आणि हळदीमध्ये असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे पदार्थ आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात.

तणाव व्यवस्थापन : या मिश्रणामुळे मानसिक तणाव आणि चिंता कमी होण्यासाठी मदत होते.

Headache : डोकेदुखीकडे दुर्लक्ष करु नका, योग्य उपचार करा, दुखणं टाळा

advertisement

ऊर्जा : या मिश्रणामुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि दिवसभर ऊर्जावान वाटतं.

रोगांपासून बचाव : हळद आणि मधाचे औषधी गुणधर्म शरीराला अनेक आजारांपासून वाचवण्यास मदत करतात.

या गोष्टी देखील लक्षात ठेवा:

एका वाटी दह्यात अर्धा चमचा मध आणि चिमूटभर हळद मिसळा. हे मिश्रण सकाळी नाश्त्याच्या वेळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी खा.

गरम दह्यामध्ये मध मिसळू नका, कारण यामुळे त्यातील पोषक घटक नष्ट होऊ शकतात.

advertisement

हळद जास्त प्रमाणात खाऊ नका, फक्त एक चिमूटभर हळद पुरेशी आहे.

कोणतीही ऍलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Curd : मध, हळद, दही खाण्याचे फायदे, त्वचेसह संपूर्ण प्रकृतीसाठी लाभदायक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल