Headache : डोकेदुखीकडे दुर्लक्ष करु नका, योग्य उपचार करा, दुखणं टाळा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
बरेच जण डोकेदुखीची तक्रार करतात. पण, डोकेदुखी कशामुळे होते हे त्यांना कळत नाही. अपुरी झोप, ताण, डिहायड्रेशन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अशा काही कारणांमुळे डोकं दुखू शकतं. यावर जीवनशैलीत आवश्यक बदल हा उपाय तर आहेच पण त्यानंतरही डोकेदुखीचं प्रमाण कायम राहिलं तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
मुंबई : डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे, काहींना हा त्रास नेहमी होतो तर काहींना कधीकधी डोकं दुखतं. काहींना डोकं दुखल्यामुळे गरगरतं, चक्कर येते. ही समस्या तात्पुरती असू शकते, पण डोकं सतत दुखत असेल तर ती चिंतेची बाब बनते. डोकेदुखीची अनेक कारणं असू शकतात आणि ती समजून घेणं खूप आवश्यक आहे जेणेकरून योग्य उपचार करता येतील.
बरेच जण डोकेदुखीची तक्रार करतात. पण, डोकेदुखी कशामुळे होते हे त्यांना कळत नाही. अपुरी झोप, ताण, डिहायड्रेशन, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अशा काही कारणांमुळे डोकं दुखू शकतं. यावर जीवनशैलीत आवश्यक बदल हा उपाय तर आहेच पण त्यानंतरही डोकेदुखीचं प्रमाण कायम राहिलं तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
advertisement
डोकेदुखी होण्याची कारणं
1. ताण तणावाचा आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. सततच्या मानसिक दडपणामुळे डोकं दुखू शकतं. डोक्यात जडपणा, डोक्यात दाब जाणवणं ही ताणाची लक्षणं आहेत. हे टाळण्यासाठी योग आणि ध्यान करा. चांगली झोप घ्या. तणाव कमी करण्यासाठी, आपल्या दिनचर्येत ब्रेक घ्यायला विसरु नका.
advertisement
2. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे म्हणजेच डिहायड्रेशनमुळे डोकेदुखी होऊ शकते. उन्हाळ्यात ही समस्या अधिक जाणवते. तीव्र डोकेदुखी, चक्कर येणं ही डिहायड्रेशनची लक्षणं आहेत. डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर पुरेशा प्रमाणात पाणी प्या. नारळ पाणी आणि फळं खाण्यावर भर द्या.
3. अपुरी झोप हे डोकेदुखीचे प्रमुख कारण असू शकतं. त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. डोकं जड वाटणं, थकवा येणं, चिडचिड होणं हे अपुऱ्या झोपेचे परिणाम आहेत. दररोज 7-8 तास झोप घ्या. झोपण्यापूर्वी स्क्रीन टाइम कमी करा. झोपेचं नियमित वेळापत्रक ठेवा.
advertisement
4. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे डोकं दुखू शकतं. यासाठी जेवणाची वेळ निश्चित करा. पौष्टिक आहार घ्या.
कॅफिन आणि तळलेलं अन्न खाणं टाळा कारण यामुळे डोकं दुखू शकतं. वेळेवर जेवण करणं शक्य नसेल तर जवळ एखादं फळ किंवा पदार्थ ठेवा, जेणेकरुन डोकेदुखी रोखता येईल.
advertisement
5. डोळ्यांवर ताण आल्यामुळेही डोकं दुखू शकतं. लॅपटॉप किंवा मोबाईल स्क्रीनवर जास्त वेळ काम केल्यानं डोळ्यांवर ताण येतो, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. यामुळे कपाळ आणि डोळ्यांजवळ दुखतं. हे टाळण्यासाठी दर 20 मिनिटांनी स्क्रीनपासून दूर पहा. स्क्रीन ब्राइटनेस कमी करा. आपले डोळे नियमितपणे तपासा.
advertisement
ताणतणाव, डिहायड्रेशन, झोप न लागणं, चुकीच्या खाण्याच्या सवयी किंवा डोळ्यांवर येणारा ताण यामुळे डोकं दुखू शकतं. याचं योग्य निदान आणि उपाय आवश्यक आहेत. डोकेदुखी कायम राहिली किंवा त्याचं प्रमाण वाढलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. आरोग्यदायी दिनचर्येचा अवलंब करून आणि तुमच्या सवयी सुधारून डोकेदुखी सहज टाळता येऊ शकते. काळजी घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 24, 2025 7:00 PM IST