Almond Powder : शरीरासाठी पोषक खाद्य - बदामाची पावडर आणि दूध प्या, बौद्धिक - शारीरिक ताकदीसाठी फायदेशीर

Last Updated:

बदाम भिजवून खात असाल आणि नंतर दूध पित असाल तर दुधासोबत बदाम पावडर घालून पिणं शरीरासाठी उपयुक्त आहे. बदाम पावडर आणि दूध या मिश्रणामुळे ताकद तर वाढतेच पण संपूर्ण आरोग्यासाठीही हे मिश्रण पोषक आहे. 

News18
News18
मुंबई : आहारात जेवणाव्यतिरिक्त फळं, सुका मेवा देखील आवश्यक आहे. यामुळे शरीराला ताकद तर मिळतेच, पण त्याचबरोबर आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात. संसर्गापासून संरक्षणासाठी, चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी सुरक्षा कवच आवश्यक आहेत.
बदाम भिजवून खात असाल आणि नंतर दूध पित असाल तर दुधासोबत बदाम पावडर घालून पिणं शरीरासाठी उपयुक्त आहे. बदाम पावडर आणि दूध या मिश्रणामुळे ताकद तर वाढतेच पण संपूर्ण आरोग्यासाठीही हे मिश्रण पोषक आहे.
advertisement
1 - शारीरिक ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त
बदामामध्ये प्रथिनं, व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स मुबलक प्रमाणात आढळतात. हे मिश्रण दुधात मिसळल्यानं शरीराला ऊर्जा मिळते आणि स्नायू मजबूत होतात. रोज व्यायाम करणाऱ्यांसाठी हे मिश्रण विशेष फायदेशीर आहे.
2 - रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी फायदेशीर
दूध आणि बदाम पावडर या मिश्रणामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. बदामामध्ये असलेले झिंक आणि मॅग्नेशियम शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत करतात. हे मिश्रण नियमित खाल्ल्यानं सर्दी, खोकला यांसारखे आजार दूर राहतात.
advertisement
3. हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम
दुधात कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं आणि बदामात फॉस्फरस भरपूर असतं. या दोन्हीच्या मिश्रणामुळे हाडं मजबूत होतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या म्हणजेच हाडं कमकुवत होण्याचा धोका कमी होतो.
4. त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
बदामातील व्हिटॅमिन ई आणि दुधात असलेल्या प्रथिनांमुळे त्वचा उजळते आणि या मिश्रणामुळे केसांची गुणवत्ता सुधारते. यामुळे त्वचा चमकदार होते आणि केस मजबूत होतात.
advertisement
5. पचन सुधारण्यासाठी उत्तम
दूध आणि बदाम पावडर या मिश्रणामुळे पचनक्रिया मजबूत होते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या इतर समस्या कमी होण्यास मदत होते.
कृती -
एक ग्लास कोमट दूध घ्या. त्यात 1-2 चमचे बदाम पावडर घाला. चवीसाठी थोडासा मध किंवा वेलची वापरा.
मिश्रण सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी प्या. पण तुम्हाला दुधाची किंवा बदामाची ऍलर्जी असेल तर हे पिऊ नका.  मधुमेह किंवा इतर आरोग्य समस्या असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे मिश्रण प्यावं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Almond Powder : शरीरासाठी पोषक खाद्य - बदामाची पावडर आणि दूध प्या, बौद्धिक - शारीरिक ताकदीसाठी फायदेशीर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement