Laughter : हसताय ना ? हसायलाच पाहिजे, शारीरिक - मानसिक आरोग्यासाठीचं औषध

Last Updated:

टीव्हीवर एखादी विनोदी मालिका पाहताना तुम्ही हसत असाल किंवा वर्तमानपत्रातील व्यंगचित्र पाहून हसत असाल तर नकळतपणे हे तुमच्या तब्येतीसाठी उत्तम आहे. काही मिनिटांच्या हसण्यानं तुमचा संपूर्ण दिवस आनंदीत होतो. हसण्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. 

News18
News18
मुंबई : एखादी आठवण, प्रसंग आठवून कधीकधी हसू येतं. एखादी चांगली आठवण तुम्हाला आनंदी करते आणि तुमचा तो दिवस चांगला जातो. कारण हसणं हे तुमच्या तब्येतीसाठी सर्वोत्तम औषध आहे. आपण हसतो तेव्हा शरीर स्वतःचं नैसर्गिक वेदनाशामक तयार करते, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
टीव्हीवर एखादी विनोदी मालिका पाहताना तुम्ही हसत असाल किंवा वर्तमानपत्रातील व्यंगचित्र पाहून हसत असाल तर नकळतपणे हे तुमच्या तब्येतीसाठी उत्तम आहे. काही मिनिटांच्या हसण्यानं तुमचा संपूर्ण दिवस आनंदीत होतो. हसण्याचा तुमच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.
advertisement
हसल्यानं तुमचा मूड सुधारतो: हसल्यामुळे जास्त ऑक्सिजन श्वासात घेतला जातो. हृदय, फुफ्फुस आणि स्नायूंना त्यामुळे उत्तेजना मिळते. मेंदूतून बाहेर पडणाऱ्या एंडॉर्फिनचं प्रमाण यामुळे वाढतं. एंडोर्फिन हार्मोन मूड चांगला ठेवण्यासाठी मदत करतो.
तणाव कमी होतो: मोठ्यानं हसल्यानं तणाव कमी होण्यासाठी मदत होते, हसल्यामुळे हृदयाची गती आणि रक्तदाबामध्ये चढ-उतार होतात. हसल्यानं रक्ताभिसरणाचा वेग वाढतो आणि स्नायूंना आराम मिळतो, या दोन्हीमुळे तणावाचा शरीरावर होणारा परिणाम कमी होण्यास मदत होते.
advertisement
रोगप्रतिकारक शक्ती सुधारते: नकारात्मक विचार आणि तणावामुळे शरीरात रसायन तयार होत असतं यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्याउलट, हसण्यामुळे न्यूरोपेप्टाइड्स बाहेर पडतात, जे तणाव आणि इतर गंभीर आजारांशी लढण्यास मदत करतात.
advertisement
नातेसंबंध मजबूत होतात : हसण्यामुळे शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यही सुधारतं. हसण्यामुळे तयार झालेला सकारात्मक बंध तणावापासून संरक्षण करण्यासाठी उपयोगी ठरतो. कोणत्याही नात्यात हास्य हे टॉनिक बूस्टरचे काम करतं. 
advertisement
नैराश्य कमी करण्यासाठी उपयुक्त : अनेकजण डिप्रेशनमध्ये असतात, त्यांच्यासाठीही हसणं हे चांगलं औषध आहे. हसण्यामुळे तुमचा तणाव, नैराश्य आणि चिंता कमी होण्यास मदत होऊन तुमचा मूड चांगला राहतो. हसण्यामुळे मेंदू न्यूरोपेप्टाइड्स, सेरोटोनिन, डोपामाइन आणि एंडोर्फिन असे हॅपी हार्मोन्स सोडतो. हे हार्मोन्स म्हणजेच संप्रेरकं नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतात. तणाव वाटत असेल तेव्हाही हसून प्रसंगाला सामोरं जा.
advertisement
  • तुम्हाला ज्यामुळे मनापासून हसता येतं असे मजेदार चित्रपट, टीव्ही शो, पुस्तकं, मासिकं किंवा विनोदी व्हिडिओ पहा.
  • कितीही वेळा पाहिले तरीही तुम्हाला पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारे व्हिडिओ किंवा रील्स तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा.
  • विनोदी पॉडकास्ट ऐकू शकता किंवा कॉमेडी क्लबमध्ये जाऊ शकता.
  • हसण्यासाठी लाफ्टर योगा हा देखील पर्याय आहे. 
advertisement
हसा आणि आनंदी राहा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Laughter : हसताय ना ? हसायलाच पाहिजे, शारीरिक - मानसिक आरोग्यासाठीचं औषध
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement