पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पपई चांगली मानली जाते. पण पपईच्या पोटातल्या काळ्या बिया, निरुपयोगी समजून फेकून देऊ नका. या बिया पोटाचं आरोग्य, मूत्रपिंड विकार, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
Migraine : मायग्रेनचा त्रास लवकर बरा करण्यासाठी महत्त्वाची टिप...डोकेदुखी होईल कमी
निरुपयोगी समजून बिया फेकून देऊ नका. या बियांमध्ये जीवनसत्त्व, जस्त, फॉस्फरस, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, शरीराला अनेक प्रकारच्या समस्यांपासून वाचवण्यासाठी हे सर्व घटक महत्त्वाचे आहेत.
advertisement
मूत्रपिंड विकार
मूत्रपिंडाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांसाठी पपईच्या बिया सेवन फायदेशीर ठरू शकतात. या बियांमध्ये आढळणारे घटक मूत्रपिंडात आढळणारे विषारी पदार्थ स्वच्छ करण्यास मदत करतात.
बद्धकोष्ठता
बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यासाठी पपईच खाण्याचा सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे पपईच्या बियांमुळेही बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास फायदा होतो. बियांमध्ये आढळणारं प्रोटीओलाइटिक एंझाइम आतड्यांमधील वाईट बॅक्टेरिया नष्ट करून आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे.
No Sugar : साखरेला करा बाय बाय, शरीरात होतील सकारात्मक बदल
कोलेस्टेरॉल
पपईच्या बिया खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल नियंत्रित होण्यास मदत होते. या बियांमध्ये असलेलं ओलेइक अॅसिड खराब कोलेस्ट्रॉल कमी करून वाढलेलं कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करू शकतं.
मधुमेह
मधुमेहाच्या रुग्णांसाठी पपईच्या बिया खाणं फायदेशीर ठरू शकतं. या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स आढळतात जे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात.