Summer Care : उन्हाळ्यात यकृताचं आरोग्य जपा, थंड पेयांचं अतिसेवन ठरु शकतं धोक्याची घंटा
टॅनिंग कमी करण्यासाठी टोमॅटोचा वापर
टॅनिंग दूर करण्यासाठी, टोमॅटो अर्धा कापा. टोमॅटोच्या आतील बाजू खरवडून घ्या जेणेकरून टोमॅटोचा रस वर येईल. यानंतर, या अर्ध्या टोमॅटोमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा बेसन घाला. आता हा अर्धा टोमॅटो चेहऱ्यावर किंवा शरीराच्या टॅनिंग असलेल्या भागावर घासा. हा उपाय हात, पाय, मान आणि पाठीवर देखील वापरता येतो. यामुळे टॅनिंग कमी होतं तसंच खराब झालेली त्वचाही यामुळे दुरुस्त होते.
advertisement
Summer Care : चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी खास टिप्स, उन्हाळ्यातही कायम राहिल त्वचेची चमक
टॅनिंगसाठी घरगुती उपाय -
- गरजेनुसार दही आणि बेसन घ्या आणि त्यात थोडी हळद मिसळा. हे मिश्रण टॅन झालेल्या त्वचेवर लावा आणि घासून घ्या. काही वेळ ठेवल्यानंतर ते धुवा. टॅनिंग कमी करण्यात याचा परिणाम दिसून येतो.
- काकडीच्या रसामुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि टॅनिंग कमी होतं. काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्यानंतर 15 ते 20 मिनिटं तसंच ठेवा आणि नंतर चेहरा धुवून स्वच्छ करा.
- टॅनिंग कमी करण्यासाठी कोरफड देखील फायदेशीर ठरू शकते. टॅनिंग झालेल्या भागावर ताजा कोरफडीचा गर लावा.
- तांदळाचं पीठ आणि दूध मिसळून टॅनिंग रिमूव्हल पॅक बनवता येतो. हा पॅक त्वचेवर लावा आणि पंधरा मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर हलक्या हातानं घासून चेहरा धुवा.
- टॅनिंग दूर करण्यासाठी नारळ तेल आणि कॉफी स्क्रब बनवता येतात. कॉफी पावडर घ्या आणि त्यात पुरेसं खोबरेल तेल घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर किंवा टॅन झालेल्या त्वचेवर लावा आणि नंतर धुवा.
यापैकी कोणताही पर्याय वापरण्याआधी पॅच टेस्ट करा, हे सर्व नैसर्गिक घटक त्वचेसाठी उपयुक्त आहेत तसंच
त्वचेवरील टॅनिंग कमी करण्याबरोबरच त्वचेचा पोत चांगला ठेवण्यासाठीही हे फायदेशीर आहे.