देहरादून : आजकाल अनेकजण वजन कसं कमी करायचं या चिंतेत असतात. काहीजणांचं वजन कितीही काहीही केलं तरी किंचित कमी होत नाही. काहीजणांचं वजन मात्र थोडं कमी होतं पण पुन्हा लगेच वाढतं. मग वजनावर उपाय तरी काय? उपाय आपल्या किचनमध्येच आहे. फक्त आपण त्याची सवय लावून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे काही दिवसांतच फरक दिसू शकतो.
advertisement
आयुर्वेदिक डॉक्टर सिराज सिद्दीकी सांगतात, जिरं जवळपास प्रत्येक किचनमध्ये आढळतं. जिऱ्यात फ्लेवोनॉयड, एल्कोनॉयड, फिनॉल्स आणि आयर्न भरपूर असतं. यातून आरोग्याला अनेक फायदे मिळतात. गॅस, ऍसिडिटीवर तर जिरं अत्यंत उपयुक्त ठरतं.
जिऱ्याचं पाणी किंवा जिऱ्याचा चहा प्यायल्यास वजन नियंत्रित राहण्यास मदत मिळते. शिवाय त्वचेसंबंधित समस्याही दूर होतात. रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते. तसंच शरिरात शुगल लेव्हल कमी असेल तर जिऱ्याचा चहा पिणं फायदेशीर असतं.
डॉ. सिराज सिद्दीकी यांनी सांगितलं की, कपभर पाण्यात चमचाभर जिरं घालून पाणी उकळून घ्यावं. पाणी अर्ध झालं की थंड करून गाळून प्यावं. दररोज सकाळी आपण हे सेवन करून शकता. यामुळे काहीच महिन्यात वजन कमी होऊ शकतं. पोटाची चरबी अगदी गायब होऊ शकते. ज्यांना जिऱ्याची एलर्जी असेल त्यांनी हे पाणी पिऊ नये. शिवाय गरोदर महिलांनीही या पाण्याचं सेवन करू नये. जिरा पाण्याचं अति सेवन झाल्यास त्वचेवर फोड येऊ शकतात, असं डॉक्टर म्हणाले.