उन्हाळ्यात उष्ण वारे, तीव्र सूर्यप्रकाश आणि प्रदूषणाचा त्वचेवर परिणाम होतो. ज्यामुळे टॅनिंग, धूळ चेहऱ्यावर जमा होते आणि त्वचा निस्तेज दिसते. यासाठी त्वचेला सूट होतील असे घरगुती मास्क वापरल्यानं त्वचेचं संरक्षण करता येतं. टॅनिंग आणि चेहऱ्यावरचे थरही स्वच्छ होतात.
उन्हाळ्यात त्वचा चमकदार आणि टवटवीत दिसण्यासाठी घरगुती उपाय सर्वोत्तम आहेत. खास नैसर्गिक फेस मास्क त्वचेसाठी वरदान ठरतात. यामुळे टॅनिंग कमी होतं आणि त्वचा खोलवर स्वच्छ करता येते. त्वचेसाठी पुरेशी आर्द्रताही यामुळे टिकवून ठेवता येते. हे फेस मास्क घरी सहजपणे बनवता येतात आणि यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं रक्षण होतं.
advertisement
Summer Care : उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी हा उपाय नक्की करा, बडीशेप - खडी साखरेचा होईल उपयोग
घरगुती फेस मास्क
1. डाळीचं पीठ आणि दह्याचा मास्क
डाळीच्या पिठामुळे मृत त्वचा निघते. दह्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. दोन चमचे बेसनामध्ये एक चमचा दही मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटांनी धुवा.
2. टोमॅटो आणि लिंबाचा मास्क
टोमॅटोमुळे टॅनिंग दूर करण्यासाठी मदत होते आणि लिंबामुळे त्वचा उजळवण्यास मदत होते. एका टोमॅटोचा रस काढा आणि त्यात एक चमचा लिंबू घाला. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी धुवा.
3. कोरफड आणि हळदीचा मास्क
कोरफडीमुळे त्वचेला थंडावा मिळतो आणि हळदीत असलेल्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी त्वचेचं रक्षण होतं. अर्धा चमचा हळद दोन चमचे कोरफडीच्या जेलमध्ये मिसळा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी धुवा.
Summer Care : टॅनिंग कमी करण्यासाठी नैसर्गिक उपचार, त्वचा दिसेल चमकदार
फेस मास्कची उपयुक्तता -
- घरगुती फेस मास्कमुळे टॅनिंग कमी होतं आणि त्वचेवर चमक येते.
- चेहऱ्यावरचे धुळीचे थर निघून जातात आणि त्वचा स्वच्छ होते.
- घरगुती फेस मास्कमधे नैसर्गिक घटक असल्यामुळे त्वचा हायड्रेटेड आणि मऊ होते.
उन्हाळ्यात त्वचा निरोगी आणि टवटवीत ठेवण्यासाठी हे घरगुती फेस मास्क वापरून पाहा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची एलर्जी असेल तर पॅच टेस्ट करायला विसरु नका.