Summer Care : उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी हा उपाय नक्की करा, बडीशेप - खडी साखरेचा होईल उपयोग
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
उन्हाळ्यात गरम हवा आणि जास्त घामामुळे शरीरातून पाणी लवकर निघून जातं, ज्यामुळे तहान वाढते. यामुळे अनेकदा, वारंवार पाणी प्यायल्यानंतरही घसा कोरडा वाटतो. यासाठी बडिशेप आणि खडी साखरेचं मिश्रण उपयोगी ठरतं.
मुंबई : एरवीपेक्षा उन्हाळ्यात जास्त तहान लागते. गरम तापमान आणि जास्त घाम येणं यामुळे शरीरातून पाणी लवकर निघून जातं, ज्यामुळे तहान वाढते. यामुळे अनेकदा, वारंवार पाणी प्यायल्यानंतरही घसा कोरडा वाटतो. तहान भागली नाही असं वाटून परत पाणी प्यायलं जातं. पण यामुळे तहान पूर्ण भागत नाही. उलट जास्त पाणी प्यायल्यानं पोट जड वाटतं, यामुळे अस्वस्थ वाटतं.
यासाठी प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर मंजू मित्तल यांनी एक माहिती देणारा व्हिडिओ शेअर केला आहे. वारंवार पाणी पिऊनही तहान लागत असेल, तर हा उपाय नक्की वापरून पाहू शकता. यासाठी, एक चमचा बडीशेपेमध्ये थोड्या प्रमाणात साखर मिसळा आणि हे मिश्रण हळूहळू चावून खा. असं केल्यानं लगेचच घशात थंडावा जाणवेल आणि तोंडही कोरडं वाटणार नाही.
advertisement
बडीशेप
बडीशेपमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात. या घटकामुळे तोंडात लाळेचा प्रवाह उत्तेजित होतो. यामुळे तोंड आणि घसा वारंवार कोरडे होत नाही. याशिवाय, बडीशेप खाल्ल्यानं तोंडाच्या कोरडेपणामुळे येणारी दुर्गंधी देखील दूर होते.
खडी साखर
खडी साखरेचा गोडवा घशाला आराम आणि थंडावा देतो. ज्यामुळे घसा कोरडा झाल्यावर जळजळ होण्याची समस्या येत नाही. त्यामुळे घसा कोरडा पडेल तेव्हा हा सोपा उपाय करून पाहू शकता किंवा बराच वेळ बाहेर राहणार असाल तर एका छोट्या डबीत बडिशेप आणि खडी साखर एकत्र करुन ठेवा. उन्हाळ्यात बाहेर गेलात तर याचा नक्की उपयोग होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 22, 2025 5:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Care : उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी हा उपाय नक्की करा, बडीशेप - खडी साखरेचा होईल उपयोग