डोकेदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते. पण हल्ली, डोकेदुखी व्यतिरिक्त मायग्रेनची समस्या अधिक सामान्य होताना दिसते आहे. मायग्रेनचा त्रास सहसा डोक्याच्या एका बाजूला होतो. ही वेदना इतकी तीव्र असते की कधीकधी औषधं देखील काम करण्यास वेळ घेतात. औषधं घेऊनही त्याचा परिणाम होण्यासाठी वेळ लागतो. याशिवाय, जेव्हा एखाद्या व्यक्तीला मायग्रेनचा त्रास होतो तेव्हा त्याला मळमळ, उलट्या होतात. प्रकाश आणि मोठा आवाजही सहन होत नाही.
advertisement
No Sugar : साखरेला करा बाय बाय, शरीरात होतील सकारात्मक बदल
मायग्रेनचा त्रास का होतो ते जाणून घेऊया -
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मायग्रेन होण्याचं कोणतंही एक कारण नाही, पण काही गोष्टींमुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. खूप ताण घेतल्यानं, पुरेशी झोप न मिळाल्यानं, जास्त प्रकाश किंवा मोठा आवाज बराच वेळ ऐकण्यामुळे मायग्रेनचा त्रास होतो. खूप काळ उपाशी राहणं किंवा उशिरा जेवणं तसंच हार्मोनल बदलांमुळेही डोकं दुखू शकतं. महिलांमध्ये मासिक पाळी दरम्यान डोकं दुखू शकतं. या सर्वांव्यतिरिक्त, वाईट आहारामुळे देखील मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध डॉक्टर सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये,डॉक्टरांनी सांगितलेला उपाय, करुन पाहायला हरकत नाही. या उपायामुळे मायग्रेनची समस्या पूर्णपणे नाहीशी होऊ शकत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
Nerve Weakness : नसा कमकुवत होण्यामागची कारणं ओळखा, वेळीच उपचार घ्या, तंदुरुस्त राहा
मायग्रेनवर नियंत्रण ठेवण्याचे आणि वेदना ताबडतोब कमी करण्याचे अनेक प्रभावी मार्ग आहेत. गरम पाण्यात पाय भिजवून ठेवणं हा त्यातलाच एक उपाय आहे. मायग्रेनचा त्रास होत असेल तर पाय काही वेळ गरम पाण्यात बुडवू शकता. डॉ. सेठी यांच्या मते, मायग्रेन दरम्यान डोक्यात रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे वेदना आणि दाब येतो. या स्थितीत, पाय गरम पाण्यात ठेवल्यानं शरीराच्या रक्ताभिसरणात थोडासा बदल होतो.
गरम पाण्यामुळे पायांमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि डोक्यातून होणारा रक्तदाब कमी होतो. यामुळे मेंदूच्या नसांवरील ताण कमी होतो आणि वेदनेपासून आराम मिळतो. ही पद्धत मायग्रेनवर उपचार नाही, परंतु ती निश्चितच वेदनेपासून आराम देऊ शकते. डॉ. सेठींव्यतिरिक्त, काही इतर आरोग्य अहवालांमधूनही ही पद्धत फायदेशीर असल्याचं निष्पन्न झालं आहे. गरम पाण्यामुळे स्नायूंना आराम मिळतो आणि ताण कमी होतो. हा ताण अनेकदा मायग्रेनचं एक प्रमुख कारण असू शकतं. त्यामुळे,ज्यांना वारंवार औषधं घ्यायची नाहीत त्यांच्यासाठी ही पद्धत विशेषतः उपयुक्त ठरू शकते.