पिथौरागढ : शरीर उष्ण ठेवण्यासाठी तसेच आजारांपासून बचाव व्हावा यासाठी निसर्गापासून मिळालेल्या अनेक वस्तूंचा वापर करुन मानव अनेक काळापासून निरोग राहत आला आहे. निसर्गापासून मिळणाऱ्या या औषधींमध्ये सर्वात आधी शिलाजीतचे नाव येते.
शिलाजीत हे हिमालय परिसरात आढळणारे एक प्रमुख खनिज आहे. आयुर्वेदात याचा फार आधीपासून वापर केला जात आहे. शिलाजीतचे नाव समोर येताच अनेकांना वाटते की, फक्त पुरुषच आपली शारिरीक क्षमता वाढवण्यासाठी वापरतात. मात्र, यासोबतच डॉक्टरांच्या सल्ल्याने पुरुषांव्यतिरिक्त महिला आणि मुलेही याचा वापर करू शकतात. शिलाजीतच्या सेवनाने शारीरिक ताकदीसोबत रोगप्रतिकारशक्ती वाढते. आज शिलाजीतचे फायदे काय आहेत, तसेच त्याला काढण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
narendra modi : लवकरच होणार भाजपचे 400 पारचे स्वप्न पूर्ण, बड्या ज्योतिषाची भविष्यवाणी
शिलाजीत भारत आणि नेपाळच्या मध्ये हिमालयाच्या पर्वतरांगांमधील उंच पर्वतांच्या खडकांमध्ये काळ्या आणि तपकिरी रंगात आढळते. हे अफगाणिस्तान, तिबेट, रशिया आणि उत्तर चिलीमध्ये देखील आढळते. ते खडकांमधून बाहेर काढणे खूप धोकादायक आहे. याला शोधण्यासाठी एका विशेष कौशल्याची आवश्यकता आहे. याच्या व्यापाराशी संबंधित लोकांमध्येच हे कौशल्य असते. अनेक दिवस शोध घेतल्यावर शिलाजीत आढळते. याचे तुकडे स्वच्छ केल्यानंतर ते शिजवले जातात आणि त्यानंतरच शिलाजीत वापरता येते. ही एक कठीण प्रक्रिया आहे. कधी कधी यात जीवाला धोकाही असतो, असेही म्हटले जाते.
10 ग्रॅमसाठी मोजावे लागतात इतके रुपये -
शिलाजीत विकणाऱ्या समीरने सांगितले की, तो मागील 10 वर्षांपासून शिलाजीत आणून विकत आहे. याची किंमत बाजारात 10 ग्रॅमसाठी 350 रुपये आहे. शिलाजित ओळखण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, त्याला थोडासे गरम केल्यावर खऱ्या शिलाजीतचा एक लांब धागा बनतो.
या रोगांवर फायदेशीर -
आयुर्वेदाचे तज्ज्ञ यांच्यानुसार, शिलाजीतमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची क्षमता असते. यामुळे शरीराची विविध रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. शिलाजीतच्या सेवनाने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि अशक्तपणाही दूर होतो. तसेच शिलाजीत हे सांधेदुखी आणि तणाव कमी करण्यासाठीही खूप उपयुक्त आहे.