गुमला : आजकालच्या धावपळीच्या जीवनात वेळच्या वेळी जेवणं आणि 8 तासांची पुरेशी झोप घेणं आपल्याला शक्य होत नाही. परिणामी वेळेआधीच शरिराला विविध आजार जडतात. काही आजारांचं निदान ते गंभीर झाल्यानंतर होतं, त्यामुळे त्यांवर सहज उपचार करणं शक्य होत नाही. म्हणूनच वेळच्या वेळी आरोग्याची तपासणी करणं आवश्यक असतंच, शिवाय दररोज सकस आहार घेणंही महत्त्वाचं आहे. अनेकजणांना युरिक ॲसिडच्या त्रासाला सामोरं जावं लागतं.
advertisement
अनियमित जीवनशैली आणि अवेळी जेवण यामुळेच शरिरातलं युरिक ॲसिड वाढण्याचा त्रास होऊ शकतो. मग सांधेदुखी, शरिराला सूज येणं, अंगावर गाठी येणं हा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे युरिक ॲसिड नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी विशेषतः आपली जीवनशैली संतुलीत असायला हवी. परंतु युरिक ॲसिड आधीच वाढलं असेल तर ते कमी करण्यासाठी नेमकं काय करावं, याबाबत डॉक्टरांकडून सविस्तर माहिती घेऊया.
हेही वाचा : पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे खूपच फायदे, त्वचेच्या समस्या ते इम्यूनिटी अन् हाडेही होणार मजबूत
आयुर्वेदिक डॉक्टर पंकज कुमार यांनी सांगितलं की, अंगदुखी आणि शरिरावर कुठेही सूज आल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. हळूहळू यातून सतत कोणीतरी शरिराला सुई टोचतंय एवढ्या असह्य वेदना होऊ शकतात. असं होण्याचं कारण म्हणजे आपल्या जॉइंट्समध्ये कणांच्या स्वरूपात कळ बसू लागते. यावर सर्वोत्तम उपाय हाच आहे की, वेळच्या वेळी संतुलीत आहार घेणं. केवळ या उपायानेच युरिक ॲसिड नियंत्रणात राहू शकतं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळ आणि अंडी यांसारखे हाय प्रोटीन पदार्थ खाऊ नये. डाळी आरोग्यासाठी उत्तम असतात, परंतु काही डाळींमधून युरिक ॲसिड वेगाने मिळतं. परंतु मूग डाळ ही अशी डाळ आहे ज्यामधून युरिक ॲसिड कमी प्रमाणात मिळतं. परंतु त्यासाठी मूग डाळ शिजल्यानंतर त्यावर आलेलं पाणी आणि फेस काढून टाकावं, कारण त्यातच युरिक ॲसिड सर्वाधिक असतं.
हेही वाचा : कोण म्हणतं वजन लगेच कमी होत नाही? 'हा' 1 उपाय करा आणि स्वत: फरक बघा
दरम्यान, शरिरात युरिक ॲसिड वाढलंय हे कळताच आपलं रक्त शुद्ध राहील, लघवीच्या जागी जळजळ होणार नाही, लघवी सुरळीत होईल अशा पदार्थांचं सेवन करावं. यासाठी आयुर्वेदातही अनेक उपाय दिलेले आहेत. त्यांचा समावेश आपल्या जीवनशैलीत करावा. तसंच भोपळ्याचा रस, काकडीचा रस, कलिंगडाचा रस, चेरीचा रस घ्यावा. ज्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राहील.
युरिक ॲसिड म्हणजे काय?
किडनी आपल्या शरिरात तयार झालेले विविध प्रकारचे केमिकल आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर काढून टाकते. या केमिकलपैकी एक म्हणजे युरिक ॲसिड. म्हणजेच युरिक ॲसिड हे एक केमिकल अर्थात रसायन आहे. जेव्हा ते शरिरात जास्त होतं, तेव्हा मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड निर्माण होतो. शिवाय युरिक ॲसिडचे कण तुटून ते शरिराच्या सांध्यांमध्ये जमा होऊ लागतात. जर त्यांचं प्रमाण वाढलं तर ते काढून टाकणं किडनीला कठीण होतं. त्यामुळे याचा सर्वाधिक त्रास लघवीला होतो. शिवाय हाय ब्लडप्रेशर, सांधेदुखी, उठता-बसताना त्रास होणं, अंगावर सूज येणं, यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर या आजारांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केलं, तर किडनी निकामी होऊ शकते.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. परंतु तरीही आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.