TRENDING:

Cholesterol: पायांवरची सूज असू शकेल कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण, धोका ओळखा, तातडीनं उपाय करा

Last Updated:

खूप वेळ उभं राहिल्यावर, खूप दमल्यावर पाय दुखू शकतात, पायांवर सूज येते. पण या व्यतिरिक्तही पायांवर सूज येत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण कोलेस्ट्रॉल वाढल्याची चिन्हं पायांवर दिसतात, त्यामुळे चुकूनही दुर्लक्ष करू नका.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शरीरातल्या अनेक बदलांचे बाह्य संकेत दिसत असतात. खूप वेळ उभं राहिल्यावर, खूप दमल्यावर पाय दुखू शकतात, पायांवर सूज येते. पण या व्यतिरिक्तही पायांवर सूज येत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण कोलेस्ट्रॉल वाढल्याची चिन्हं पायांवर दिसतात, त्यामुळे चुकूनही दुर्लक्ष करू नका.
News18
News18
advertisement

कोलेस्टेरॉल वाढणं ही समस्या खूप वाढली आहे. पण, कोलेस्टेरॉल खूप वाढतं तेव्हा ते थेट हृदयावर हल्ला करतं.

आपल्या शरीरात दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात, चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे एचडीएल आणि खराब कोलेस्ट्रॉल म्हणजे एलडीएल. शरीरात LDL म्हणजेच वाईट कोलेस्टेरॉल वाढतं तेव्हा शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये थर जमा होऊ लागतो. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाला अडथळे जाणवतात. लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.

advertisement

Healthy Juice : तीन भाज्यांचा ज्यूस ठेवेल तब्येत ठणठणीत, अपचन, अशक्तपणा होईल दूर

कोलेस्टेरॉल हा शरीरातील पेशी आणि रक्तामध्ये आढळणारी एक प्रकारचा चरबी आहे, पेश निरोगी ठेवण्यासाठी हा घटक आवश्यक आहे. पण, शरीरात खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL चं प्रमाण वाढतं तेव्हा अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे शरीरातील धमन्या कडक होतात आणि हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढतो. यामुळे रक्तदाब वाढू शकतो आणि नसांमध्ये अडथळा निर्माण होण्याचा धोकाही असतो. म्हणूनच शरीरात एलडीएल वाढल्यास ताबडतोब सतर्क व्हा.

advertisement

या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका -

बधीरपणा आणि मुंग्या येणं: शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा रक्तप्रवाह नीट होत नाही. त्यामुळे पायात सुन्नपणा किंवा मुंग्या येतात. विशेषतः बसून किंवा उभं राहिल्यानंतर ही समस्या आणखी वाढू शकते.

पाय दुखणं किंवा पेटके येणं: पायांमध्ये सतत वेदना होत असतील. चालण्यात अडचण येत असेल तर कोलेस्ट्रॉल वाढल्याचं हे लक्षण असू शकतं. या अवस्थेला परिधीय धमनी रोग (PAD) म्हणतात. यामध्ये पायांच्या धमन्या आकुंचित होऊ लागतात.

advertisement

पाय थंड होणं: कोलेस्ट्रॉल वाढतं तेव्हा शरीरात रक्ताभिसरण योग्य प्रकारे होत नाही. रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे पाय थंड होऊ शकतात. विशेषतः पायाची बोटं बर्फासारखी थंड होऊ शकतात. ही समस्या विशेषतः मधुमेह आणि कमी रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येते.

Reels Addiction : रिल्स पाहण्याचं घातक व्यसन, सोशल मीडियाच्या अधीन होऊ नका, मेंदू शाबूत ठेवा

advertisement

पायाच्या त्वचेचा रंग बदलणं: कोलेस्टेरॉल वाढतं तेव्हा शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते. यामुळे पायांच्या त्वचेचा रंग फिकट किंवा निळा होऊ शकतो. काहीवेळा, पायांवर पिवळे आणि गडद लाल पुरळ देखील दिसतं.

पायांना सूज येणं : शरीरात रक्तप्रवाह नीट होत नाही तेव्हा सूज येण्याची समस्याही वाढते. विशेषत: पायाची बोटं आणि घोट्याला सूज येते आणि जास्त वेळ उभं राहण्यास त्रास होतो.

कोलेस्टेरॉल वाढण्यापासून रोखण्यासाठी काय करावं ?

कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, ताजी फळं, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेले पदार्थ जसे की मासे, अक्रोड, जवस यांचा समावेश करावा.

  • तळलेलं अन्न खाऊ नका, जास्त तेल आणि मसालेदार खाणं टाळा.
  • दररोज किमान तीस मिनिटं चाला किंवा हलका व्यायाम करा.
  • मद्यपान किंवा धूम्रपान टाळा कारण यामुळे रक्तवाहिन्यांना नुकसान होऊन कोलेस्ट्रॉल वाढू शकतं.
  • रक्त प्रवाह योग्य ठेवण्यासाठी दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cholesterol: पायांवरची सूज असू शकेल कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण, धोका ओळखा, तातडीनं उपाय करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल