वर्धा : फलाहार हा उत्तम आरोग्याचा मंत्र आहे, असं म्हणतात. हीच फळं आपली त्वचादेखील सुंदर ठेवतात. यात इन्स्टंट एनर्जी देणारं फळ म्हणजे केळी. केळीमध्ये वेगवेगळे पोषणमूल्य असतात. त्यामुळे केळीमध्ये काही घरगुती वस्तू अॅड करून फेस मास्क बनवता येईल. केळीच्या फेस मास्कमुळे त्वचा नैसर्गिकरित्या मॉईश्चराईज होते. त्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि डागविरहीत होऊ शकते, नैसर्गिकरित्या त्वचा उजळते. स्कीन टाईटनिंगसाठी आणि चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करण्यासाठी केळीचा उपयोग होतो. त्यामुळे केळी पासून घरीच चार फेस मास्क कसे बनवायचे याबद्दल वर्धा येथील ब्युटिशियन प्रीती खडसे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
1) बनाना + मध
स्मॅश केलेली केळी आणि मध एकत्रित करून हा पॅक तुम्ही चेहऱ्यावर किंवा टॅन झालेल्या त्वचेवर लावू शकता. 10 मिनिटांत हा पॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याने चोळून धुवायचा आहे. लक्षात ठेवा की सर्व पॅकमध्ये वापरला जाणारे केळी हे डाग असलेली वापरावी म्हणजे ती केमिकलने पिकवलेली नसावी. नैसर्गिकरित्या पिकलेली केळी वापरलेली या ठिकाणी फायदेशीर ठरेल.
What Is Cystic Acne : कशामुळे होतो सिस्टिक अॅक्नेचा त्रास? या उपायांनी मिळेल आराम..
2) कच्च दूध + पिकलेली केळी
कच्च दूध आणि पिकलेली केळी घेऊन चांगली पेस्ट तयार करायची आहे. या पेस्टला चेहऱ्यावर मास्क बनवून लावायचे आहे. हा पॅक चेहऱ्यासह हाता पायावरील आणि मानेवरील टॅनिंग काढण्यास मदत होऊ शकतो. 10 ते 15 मिनिटे हा मास्क फेस वर ठेवल्यानंतर धुऊन टाकायचा आहे.
3) केळी+तांदुळाचे पिठ+कच्च दूध+मध+गुलाबजल
पिकलेली केळी आणि तांदळाचे पीठ तसेच कच्च दूध मध आणि गुलाब जल ॲड करून हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर किंवा टॅन झालेल्या स्किनवर लावू शकता. दहा ते पंधरा मिनिटं हा पॅक सुकल्यानंतर साध्या पाण्याने धुवून टाकायचा आहे.
का पिवळे होतात दात? हे कोणत्या रोगाचं लक्षण? डेंटिस्टनंस सांगितल्या चमकवण्याच्या Tips
4) केळी +कोरफड+मध
केळी चांगली बारीक करून घेऊन त्यात कोरफडचा गर आणि मध एकत्र करून पेस्ट बनवून तुम्ही चेहऱ्यावर आपलाय करू शकता. गरज वाटल्यास सर्व पॅकमध्ये गुलाब जल वापरता येईल. हा पॅक सुकल्यानंतर साधारण पाण्याने धुऊन टाकायचा आहे. हे सर्व पॅक बॉडी पॅक म्हणूनही वापरू शकतो.
पॅक रिमूव्ह कसे कराल ?
केळीचा कोणताही फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी सुकल्यानंतर पाण्याने ओला करायचा आणि हाताने पाच मिनिटं चांगला मसाज करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर साधारण पाण्याने पूर्ण पॅक काढून घ्यायचा आहे. त्यानंतर चेहरा पुसून घेऊन त्यावर चांगलं मॉईश्चराईजर लावून घ्यायचा आहे. तर अशाप्रकारे तुम्ही केळीचे वेगवेगळे फेस मास्क तयार करून विशेषतः उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेऊ शकता, असं प्रीती खडसे यांनी सांगितले.





