advertisement

What Is Cystic Acne : कशामुळे होतो सिस्टिक अ‍ॅक्नेचा त्रास? या उपायांनी मिळेल आराम..

Last Updated:

Skin Care Tips : पोटाचे आरोग्य चांगले नसणे, बाहेरील वातावरण, तेलकट आणि अनारोग्यकारक पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, त्वचेची काळजी न घेणे. या सर्व गोष्टींमुळे चेहऱ्यावर पुरळ येतात. या पुरळांचा सर्वात गंभीर प्रकार म्हणजे सिस्टिक अ‍ॅक्ने.

News18
News18
मुंबई : त्वचा खराब होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. आपले पोटाचे आरोग्य चांगले नसणे, बाहेरील वातावरण, तेलकट आणि अनारोग्यकारक पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, त्वचेची काळजी न घेणे. या सर्व गोष्टींमुळे चेहऱ्यावर पुरळ येतात. या पुरळांचा सर्वात गंभीर प्रकार म्हणजे सिस्टिक अ‍ॅक्ने. हे खूप वेदनादायक आणि विचित्र दिसतात. आज आपण हे सिस्टिक अ‍ॅक्ने नेमके कशामुळे होतात आणि त्यावर काही घरगुती सोपे उपाय पाहणार आहोत.
त्वचेच्या समस्या झाल्यास वेदना आणि इरिटेशन होणे सामान्य असते. पण यामुळे आपला चेहरा खराब दिसतो, ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वातही प्रभाव पडतो. हे सिस्टिक अ‍ॅक्ने त्वचेच्या समस्यांपैकी सर्वात गंभीर प्रकार आहे. तुमच्या त्वचेच्या खाली खोलवर तयार होणारे सिस्ट अशाप्रकारे वर येतात. चला पाहूया सिस्टिक अ‍ॅक्ने कसे तयार होतात.
कसे होतात सिस्टिक अ‍ॅक्ने..
जंतू, तेल आणि कोरड्या त्वचेच्या पेशींमुळे त्वचेची छिद्रे बंद होतात. ज्यामुळे सिस्टिक अ‍ॅक्ने दिसू लागतात. यासोबत त्वचा लाल होते आणि त्यावर सूजदेखील येते. हा खुओ वेदनादायक प्रकार असतो. तेलकट त्वचा असलेल्या लोकांना सिस्टिक अ‍ॅक्नेचा त्रास होण्याची शक्यता असते. हे वृद्ध व्यक्ती, महिला आणि किशोरवयीन लोकांमध्ये जास्त प्रमाणात आढळतात.
advertisement
सिस्टिक अ‍ॅक्नेवर हे उपाय आहेत उपयुक्त..
- हळदीचा फेस पॅक सिस्टिक अ‍ॅक्ने घालावण्यासाठी वापरला जाऊ शकतो. हळदीतील दाहक-विरोधी आणि जंतुनाशक गुणधर्म वेदनांपासून आराम देतात आणि बरे होण्यास मदत करू शकतात. हळद आणि पाण्याची घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट थेट प्रभावित भागावर लावा आणि सुमारे 45 मिनिटे ठेवल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
advertisement
- सिस्टिक अ‍ॅक्नेवर उपचार म्हणून टी ट्री ऑइल किंवा इतर तेलयुक्त उत्पादने वापरू शकता. तेलातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेला स्वच्छ करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
- सिस्टिक अ‍ॅक्नेमुळे होणारी वेदना काही वेळा असह्य असू शकते. सिस्टिक मुरुमांवर बर्फाचा क्यूब वापरल्याने वारंवार सूज, खाज सुटणे, वेदना आणि लालसरपणा कमी होतो.
advertisement
- सिस्टिक अ‍ॅक्नेवर उपाय म्हणून अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापरही करता येतो. यामध्ये अँटी बॅक्टरीयल गुणधर्म असतात, जे त्वचेवरील सिस्टिक अ‍ॅक्ने दूर करतात. यासाठी 1 कप पाण्यात एक चमचा अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर टाका. या पाण्याने चेहरा व्यवस्थित धुवा.
सिस्टिक अ‍ॅक्नेचा कसे टाळावे?
- सिस्टिक अ‍ॅक्ने ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, ती आपण पूर्णपणे घालवू शकता नाही. पण, त्यावर सहज नियंत्रण ठेवता येते. पुष्कळदा अशी जळजळ होण्याचे कारण आपल्या आहाराचा परिणाम असतो. पोषणतज्ञांच्या मते, अ‍ॅक्ने दुग्धजन्य पदार्थांमुळे होऊ शकतात. त्यामुळे आहारातून दूध, चीज आणि दही यासह दुग्धजन्य पदार्थ कमी करण्याचा प्रयत्न करा. याव्यतिरिक्त, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि साखर हे दाहक घटक आहेत, ज्यामुळे सिस्टिक अ‍ॅक्ने होतात.
advertisement
- सिस्टिक मुरुमांचा धोका असलेल्या लोकांनी उच्च सॅलिसिलिक अ‍ॅसिड असलेले क्लींजर वापरावे. ज्यामध्ये बीटा हायड्रॉक्सी अ‍ॅसिड (BHA) असते, जे अतिरिक्त तेल आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकून सिस्टिक अ‍ॅक्ने कोरडे आणि संकुचित करण्याचे काम करते. सॅलिसिलिक अ‍ॅसिडचे प्रमाण सामान्यत: 0.5 ते 2% पर्यंत असते.
- सिस्टिक अ‍ॅक्नेचा धोका टाळण्यासाठी आणि आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आपण चेहरा वारंवार मॉइश्चराइज केला पाहिजे. ऑइल-फ्री मॉइश्चरायझर देखील सिस्टिक मुरुमांपासून दूर ठेवण्यास मदत करू शकतात. सिस्टिक मुरुम टाळण्यासाठी सेरामाइड्स, नियासिनमाइड किंवा हायलुरोनिक अ‍ॅसिड असलेले मॉइश्चरायझर वापरणे फायदेशीर ठरू शकते.
advertisement
- बऱ्याच तज्ञांचा असा विश्वास आहे की, पोट आणि त्वचेच्या आरोग्याचा संबंध असतो. काहीजण असे ठामपणे सांगतात की, प्रोबायोटिक्स नियमितपणे घेतल्याने निरोगी त्वचा वाढण्यास मदत होते. प्रोबायोटिक्स मिळविण्यासाठी भाज्या आणि इतर पदार्थ खाण्याचा सल्ला देतात, ज्यात चांगले बॅक्टेरिया असतात.
- यानंतरही परिस्थिती असह्य होत असेल आणि कोणताही उपाय काम करत नसेल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या, जे समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर अचूक उपचार करतील.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
What Is Cystic Acne : कशामुळे होतो सिस्टिक अ‍ॅक्नेचा त्रास? या उपायांनी मिळेल आराम..
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले? 'सिक्रेट लिस्ट'ने वाढवलं टेन्शन
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; कोणाला फायदा होणार हे आधीच ठरले
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement